---Advertisement---

शाहिद आफ्रिदीचं मोदींवर वादग्रस्त वक्तव्य – म्हणतोय, ‘मोदींनी आता..’

On: सोमवार, मे 12, 2025 7:03 AM
Shahid afridi
---Advertisement---

ऑपरेशन सिन्दुरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. तरीही पाकिस्तान त्यांची जुनी सवय सोडत नाही. ते पुन्हा भारतावर लपून छपून वार करतच आहेत. तत्पूर्वी पुन्हा एकदा आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकदा भारताविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रविवार रोजी पाकिस्तान सैन्याचे कौतुक करत त्याने म्हटले की, भारतीय सैन्याविरुद्ध ही एक निर्णय प्रतिक्रिया. तो म्हणाला, नवी दिल्लीने इस्लामाबादला कमी समजले होते.

कराचीच्या सीव्यू आयोजित यौम- ए – तशकूर रॅलीमध्ये बोलताना तो म्हटला, “भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युद्धात प्रति असलेल्या भावनेमुळे त्यांनी भारताला एका मोठ्या संकटात टाकले आहे”. तो म्हणाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता जाणीव झाली असेल की, पाकिस्तानशी भिडणे किती महागात पडू शकते.

याआधी शाहिद आफ्रिदीच्या घरातील एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यावर पाकिस्तानचा झेंडा झळकत होता. वारे वाहत असताना शाहिद आफ्रिदी त्याच्या घराच्या छतावर फिरताना दिसत होता.

22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. ज्यानंतर 15 दिवसांमध्येच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने बदला घेतला. भारतीय सैन्याच्या कारवाईत 90 दहशतवाद्यांना कंठस्नान देण्यात आले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पासूनच शाहिद आफ्रिदी वादग्रस्त वक्तव्य करत आहे. त्याने या हल्ल्यासाठी देखील भारतीय सैन्याला दोषी ठरवले होते. त्यानंतर शिखर धवन सोबत भारतीय काही खेळाडूंनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---