पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने १५ एप्रिल २००५मध्ये भारतविरुद्ध कानपूर येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर ४६चेंडूत वेगवान शतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. यात १० चौकारांचा आणि ९ षटकारांचा समावेश होता. भारताविरुद्ध वनडेत कोणत्याही फलंदाजाने केलेले हे सर्वात वेगवान शतक होते. Fastest Century In ODI Against India
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५०षटकात ६ बाद २४९ धावा केल्या होत्या. यावेळी संघाचा कर्णधार राहुल द्रविडने (Rahul Dravid) ११५ चेंडूत सर्वाधिक ८६ धावा केल्या होत्या. तसेच मोहम्मद कैफच्या ८८ चेंडूतील ७८ धावांचाही यात समावेश होता.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत आफ्रिदीने २२१.७३ च्या स्ट्राईक रेटने १०२ धावांची दमदार शतकी खेळी करुन ४२.१ षटकातच पाकिस्तानला ५ विकेट्सने हा सामना जिंकून देण्यात मोलाच वाटा उचलला होता. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सलामीवीर पुस्कार मिळाला होता.
त्या सामन्यात आफ्रिदी व्यतिरिक्त शोएब मलिकने (Shoaib Malik) पाकिस्तानकडून खेळताना ६० चेंडूत ४१ धावा केल्या होत्या. तर, त्यावेळीचा पाकिस्तानचा कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam Ul Haq) याने ३३ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले होते.
तसेच भारताकडून गोलंदाजी करताना अनिल कुंबळेने (Anil Kumble) २, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागने प्रत्येकी १ विकेट घेतली होती.
वनडेत सर्वात वेगवान शतक करणारे ५ फलंदाज-
३१ चेंडू- एबी डिविलियर्स (दक्षिण आफ्रिका), वेस्ट इंडीजविरुद्ध (२०१५)
३६ चेंडू- कोरी एंडरसन (न्यूझीलंड), वेस्ट इंडीजविरुद्ध (२०१४)
३७ चेंडू- शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान), श्रीलंकाविरुद्ध (१९९६)
४४ चेंडू- मार्क बाउचर(दक्षिण आफ्रिका), झिंबाब्वेविरुद्ध (२००६)
४५ चेंडू- शाहिद आफ्रिदी(पाकिस्तान), भारतविरुद्ध (२००५)
ट्रेंडिंग घडामोडी-
-एका संघाला विश्वचषक जिंकून दिलेला प्रशिक्षक होणार बडोद्याचा महागुरु
-भारताने पाकिस्तानला दिला धोबीपछाड , थेट विश्वचषकाला पात्र
-गर्लफ्रेंड की शेजारी? चहलच्या प्रश्नाने गोंधळला शमी