आयपीएल 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 नोव्हेंबर रोजी दुबई येथे पार पडेल. या लिलावात कोणत्या खेळाडूला किती रक्कम मिळणार याबाबत भविष्यवाणी आत्तापासून सुरू झाली आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने देखील एका मुलाखतीत बोलताना त्याला वाटत असलेल्या सर्वात महागड्या भारतीय खेळाडूविषयी खुलासा केला आहे.
आयपीएल रिटेन्शनमध्ये पंजाब किंग्स संघाने तमिळनाडूचा आक्रमक फलंदाज शाहरुख खान याला रिलीज केले आहे. शाहरुख याला पंजाब मागील हंगामासाठी नऊ कोटी रुपये देत होता. शाहरुख आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. याच कारणाने अश्विनने त्याला मोठी किंमत मिळणार असल्याचे म्हटले. तो म्हणाला,
“त्याला सोडले हा निर्णय चांगला आहे की नाही हे मला माहीत नाही. मात्र, त्याने त्याचे काम योग्यरीतीने केले होते. आता तो लिलावात उतरला असताना त्याला दहा ते बारा कोटी रुपये किंमत मिळू शकते. कारण भारतीय फिनिशर अनेक संघांकडे नाहीत.”
अश्विन पुढे म्हणाला,
“मला वाटते की गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स त्याच्यासाठी बोली लावतील. हार्दिक पांड्या गेल्यानंतर आता गुजरातकडे फिनिशर म्हणून खेळाडूची कमतरता आहे. तर चेन्नई स्थानिक खेळाडू म्हणून त्याच्यावर बोली लावेल. मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईने त्याला आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. यावेळी कदाचित ते त्याला आपल्या संघात सामील करून घेतील.”
शाहरुख खान हा 2021 पासून आयपीएलमध्ये पंजाबसाठी खेळत आहे. यामध्ये त्याला काही सामने वगळता अपेक्षित कामगिरी करता आले नाही. त्यामुळे पंजाबने त्याला आता रिलीज करण्याचा निर्णय घेतला असून, ते त्याच्यावर बोली लावण्याची शक्यता कमी आहे.
(Shahrukh Khan Might Get 10 To 12 Crores In IPL 2024 Auction)
महत्वाच्या बातम्या –
बीड क्रिकेटची शान वाढवणारा सचिन! युएईमध्ये खेळणार टीम इंडियासाठी U19 आशिया कप
अखेर हेजलवूडला संघातून वगळण्याचं कारण समजलं! आरसीबीच्या धाडसी निर्णयामागे आहे ‘हे’ कारण