आजपासून आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होत आहे. तसेच आरसीबी विरुद्ध केकेआर संघामध्ये आज पहिला सामना ईडन गार्डनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याने चक दे इंडिया चित्रपटांमध्ये भारतीय महिला हॉकी संघाला शानदार पद्धतीने अंतिम सामना जिंकून देण्यात मदत केली होती. आता आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सामन्या आधी सुद्धा त्याने असंच काहीतरी केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. ज्यामध्ये तो आरसीबी विरुद्ध सामन्यासाठी कोलकाता संघाला आत्मविश्वास देण्याचे काम करत आहे.
शाहरुख खान संघातील नवीन खेळाडूंना भेटला प्रशिक्षकांपासून कर्णधार अजिंक्य रहाणेची सुद्धा भेट घेतली. त्याने संघाला आत्मविश्वासाने म्हटले की सर्व खेळाडूंवर देवाचा आशीर्वाद राहो, सगळे स्वस्त आणि आनंदात राहो. तसेच चंद्रकांत पंडित सरांचे आभार जे संघाला मजबुतीने पुढे नेण्याचे काम करतील. नवीन सर्व खेळाडूंचे स्वागत आहे.
अजिंक्य रहाणे या आधी सुद्धा कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी खेळलेला आहे. त्याने 2022 मध्ये या संघासाठी 7 सामने खेळत 133 धावा केल्या होत्या, पण तो पहिल्यांदा कोलकाता संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएलच्या इतिहासात केकेआरचा हा 9 वा कर्णधार असणार आहे.
अजिंक्य रहाणे आयपीएलच्या मेगा लिलावात अनसोल्ड ठरला होता, पण दुसऱ्या वेळेस नाव घेतल्यावर केकेआर संघाने त्याला 2 करोड रुपयांना खरेदी केले. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात आत्तापर्यंत त्याने 185 सामन्यांमध्ये 4642 केल्या आहेत. त्याच्या आयपीएल करिअरमध्ये त्याने 2 शतक आणि 30 अर्धशतके केली आहेत. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये तो 12 व्या स्थानी आहे. तसेच 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो लवकरच सामील होऊ शकतो.