नेदरलँड्स आणि ओमान यांच्यात 16 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात नेदरलँड्सनं 29 धावांनी विजय मिळवला. यासह नेदरलँड्सनं तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात ओमानचा पराभव झाला असला तरी संघाचा खेळाडू शकील अहमद यानं एक असा चमत्कार केला, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. शकील अहमदनं आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एक मोठा विश्वविक्रम मोडला.
तिसऱ्या टी20 सामन्यात नेदरलँड्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 विकेट गमावून 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, ओमानला 9 गडी गमावून केवळ 118 धावाच करता आल्या आणि नेदरलँड्सनं सामना 29 धावांनी जिंकला. या सामन्यात ओमानकडून 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शकील अहमदनं टी20 आंतरराष्ट्रीय विश्वविक्रम मोडीत काढला.
ओमानच्या डावात शकील अहमद 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानं 33 चेंडूत 45 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्यानं 3 चौकार आणि 2 षटकार मारले. शकीलनं 45 धावांच्या या खेळीनं वेस्ट इंडिजच्या अकील होसेननं केलेला विश्वविक्रम मोडला. आता तो टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 10व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विश्वविक्रम अकेल होसेनच्या नावावर होता.
अकेल होसेननं 2022 साली इंग्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 44 धावांची नाबाद खेळी खेळली होती. आता ओमानचा खेळाडू शकील अहमद टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 10व्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे.
टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 10व्या क्रमांकावर सर्वाधिक धावा
45 – शकील अहमद (ओमान) विरुद्ध नेदरलँड्स, 2024
44* – अकेल होसेन (वेस्ट इंडीज) विरुद्ध इंग्लंड, 2022
40* – फित्री शान (मलेशिया) विरुद्ध भूतान, 2022
40 – सोमपान कामी (नेपाळ) विरुद्ध हाँगकाँग, 2014
38* – मोहम्मद अदनान (सौदी अरेबिया) विरुद्ध कतार, 2019
हेही वाचा –
BGT; “घरच्या मैदानावर फलंदाजी करणे कठीण…” ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे मोठे वक्तव्य!
IND vs AUS; हर्षित राणा की प्रसिद्ध कृष्णा? पहिल्या सामन्यासाठी कोणाला मिळणार संधी?
IPL Mega Auction; ‘हे’ 3 संघ मेगा लिलावात डेव्हिड मिलरला करणार टार्गेट?