शाकिब अल हसन आणि मुशफिकूर रहीम याची जोडी मागच्या अनेक वर्षांपासून बांगलादेश क्रिकेटसाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. वनडे विश्वचषख 2023चा 11 सामना शुक्रवारी (13 ऑक्टोबर) बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यात देखील शाकिब आणि मुशफिकूर रहीम यांनी संघाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महत्वाची भागीदारी पार पाडली. त्याचसोबत खास यादीत दुसरा क्रमांक देखील पटकावला.
बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कर्णधार केन विलियम्सनने घेतलेला हा निर्णय अगदी योग्य ठरला. संघाची धावसंख्या अवघी अवघी 56 असताना बांगलादेशच्या चार महत्वपूर्ण विकेट पडल्या होत्या. पाचव्या विकेटसाठी शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) आणि मुशफिकूर रहीम (Mushfiqur Rahim) यांच्यात 108 चेंडूत 96 धावांची भागीदारी पार पडली. शाकीब वैयक्तिक 40 धावा करून बाद झाल्यामुळे शतकी भागीदारी थोडक्यात हुकली.
असे असले तरी, शाकीब आणि मुशफिकूर यांच्यातील ही भागीदारी ऐतिहासिक ठरली, असे म्हणता येईल. आता वनडे विश्वचषकातील दुसरा सर्वात यशस्वी भागीदारी म्हणून शाकीब आणि मुशफिकूर यांचे नाव घेतले जाईल. विश्वचषकात या दोघांमध्ये एकत्र खेळताना आतापर्यंत 19 डावांमध्ये 972 धावा केल्या आहेत. यादीत पहिला क्रमांक मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) आणि ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांचा आहे. या दोघांनी विश्वचषकातील 20 डावांमध्ये तब्बल 1220 धावा एकत्र धोडल्या आहेत. (Shakib Al Hasan and Mushfiqur Rahim are the second highest run-scoring partnership in the World Cup)
विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्या –
मॅथ्यू हेडन – ऍडम गिलक्रिस्ट (ऑस्ट्रेलिया) – 20 डावांमध्ये 1220 धावा
मुशफिकूर रहीम – शाकिब अल हसन (बांगलादेश) – 19 डावांमध्ये 972 धावा
विरेंद्र सेहवाग – सचिन तेंडुलकर (भारत) – 20 डावांमध्ये 971 धावा
मार्टिन गप्टील – ब्रँडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – 17 डावांमध्ये 838 धावा
दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात बांगलादेशने आपल्या सुरुवातीच्या 6 विकेट्स 35.5 षटकात संघाची धावसंख्या 175 असताना गमावल्या. लॉकी फर्ग्युसन याने तन्झिम हसन, मेहिदी हसन मिराझ आणि शाकिब अल सहन यांना तंबूत घाडले.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
न्यूझीलंड – डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (क), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (डब्ल्यू), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
बांगलादेश – लिटन दास, तन्झिद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराझ, शाकिब अल हसन (क), मुशफिकुर रहीम (डब्ल्यू), तौहिद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया vs दक्षिण आफ्रिका सामन्यात गोंधळ! मार्कस स्टॉयनिस आणि स्टीव स्मिथच्या विकेटमुळे वाद
IND vs PAK सामन्यापूर्वी होणार भव्य सोहळा, प्रसिद्ध बॉलीवूड गायक दाखवणार आपल्या आवाजाची जादू