यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेत भारतानं धमाकेदार कामगिरी केली आहे. त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. भारतानं सुपर 8 मधील सलग 2 सामने जिंकून सेमीफायनलसाठी तिकीट जवळपास निश्चित केलं आहे. शनिवारी (22 जून) झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशला धूळ चारली. परंतु या सामन्यात अनुभवी खेळाडू शकीब अल हसननं (Shakib Al Hasan) इतिहास रचला.
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) टी20 विश्वचषक स्पर्धेत 50 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. रोहित शर्माची (Rohit Sharma) विकेट घेऊन त्यानं टी20 विश्वचषकात 50 विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला. शकिब अल हसननं भारताविरुद्ध 3 षटकं गोलंदाजी केली. भारतानं शाकिबच्या गोलंदाजीवर खूप धावा ठोकल्या. परंतु शाकिबनं या सामन्यात 1 विकेट घेतली.
शाकिब अल हसननं (Shakib Al Hasan) टी20 विश्वचषकाच्या 42 सामन्यात 50 विकेट्स पूर्ण केल्या. टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, शाकिब अल हसन अव्वल स्थानी आहे. यानंतर शाहिद आफ्रिदी 39, लसिथ मलिंगा 38, वनिंदू हसरंगा 37 आणि ॲडम झम्पानं 36 विकेट्स घेतल्या आहेत.
शाहिद आफ्रिदी आणि लसिथ मलिंगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तर, शाकिब अल हसन, वनिंदू हसरंगा आणि ॲडम झम्पा हे खेळाडू अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत. त्यामुळे या यादीत अजून उलटफेर पाहायला मिळू शकतो.
शाकिब अल हसननं (Shakib Al Hasan) 128 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 149 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्यानं 2 वेळा एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी सरासरी 20.79 राहिली आहे. तर इकाॅनाॅमी रेट 6.83 राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ENG vs USA सामन्यात इंग्लंडनं जिंकला टाॅस; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
मुलामुलींना समान संधी देण्यास प्राधान्य, ऑलिम्पिक दिनाच्या निमित्ताने क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आश्वासन
भारत जाणार विश्वचषकाबाहेर, फक्त ‘ही’ समीकरणं जुळून आली तर होणार अवघड