संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या आशिया चषक 2022 मधील तिसरा सामना अफगाणिस्तान व श्रीलंका यांच्या दरम्यान खेळला गेला. आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलेल्या अफगाणिस्तानचे लक्ष हा सामना जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश करण्याचे होते. तसेच बांगलादेश संघ आशिया चषकातील आपल्या अभियानाची सुरुवात करत होता. त्याचवेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याच्यासाठी देखील हा सामना संस्मरणीय ठरला.
💯 up!
Another day, another milestone for Shakib Al Hasan 👏
His best T20I performances 👉 https://t.co/q0PfU8OA3Z pic.twitter.com/TkcFXrjBVc
— ICC (@ICC) August 30, 2022
शारजा येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानावर उतरताना शाकीब याने बांगलादेशसाठी 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा बांगलादेशी क्रिकेटपटू ठरला. त्याच्या आधी मुशफिकूर रहीम व मोहम्मदुल्लाह यांनी ही कामगिरी केली आहे. परंतु, या विक्रमी सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. 9 चेंडूत 11 धावा करत तो मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला.
शाकिबच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीचा विचार केला तर त्याने 99 टी20 मध्ये 2010 धावा व 121 बळी मिळवले आहेत. सोबतच तो आतापर्यंत तीन वेळा बांगलादेश संघाचा कर्णधारही राहिला आहे.
शाकिबच्या इतर कारकिर्दीचा विचार केल्यास त्याने 63 कसोटीत 4251 धावा व 227 बळी टिपलेत. तर वनडे क्रिकेटमध्ये 221 सामन्यात 6755 धावा व 285 बळी त्याच्या नावावर आहेत.
शाकिब हा सातत्याने वादात सापडलेला असतो. मैदानावर पंचांशी वाद घालताना तो अनेकदा दिसला आहे. तसेच 2019 वनडे विश्वचषकानंतर सट्टेबाजांना भेटल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षाची बंदी घातली गेली होती. नुकतेच एका बेटिंग कंपनीची जाहिरात केल्यामुळे देखील त्याच्यावर निलंबन आणण्याचा बांगलादेश क्रिकेट बोर्ड प्रयत्न करत होते. मात्र, शाकिबने हा निर्णय बदलल्याने कारवाई टळली.