बांगलादेश क्रिकेट इतिहासातील आजवरचा सर्वात्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून अष्टपैलू शाकिब अल हसनचे नाव घेतले जाते. मैदानावरील कामगिरीसाठी त्याचे जितके कौतुक केले जाते, तितकेच तो वादात देखील अडकतो. यापूर्वी, स्वतःच्या क्रिकेट बोर्डाशी संघर्ष तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून निलंबन यासारख्या घटना त्याच्यासोबत घडल्या आहेत. नुकत्याच एका स्थानिक सामन्यात गैरवर्तणूक केल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यावर अशा वर्तणूकीसाठी चाहत्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी केली.
काय आहे हे प्रकरण?
सध्या बांगलादेशमध्ये ढाका प्रीमियर लीग ही स्थानिक टी२० स्पर्धा खेळली जात आहे. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर स्पर्धेतील ४० वा सामना मोहम्मदेन स्पोर्टिंग विरुद्ध अबाहानी लिमिटेड यांच्या दरम्यान खेळला गेला. शाकिब मोहम्मदेन स्पोर्टिंग संघाचे प्रतिनिधित्व करत होता. शाकिब (३७) व महमदूल हसन (३०) यांच्या खेळल्यामुळे मोहम्मदेन स्पोर्टिंगने २० षटकांमध्ये १४५ धावा धावा फलकावर लावल्या.
Shit Shakib..! You cannot do this. YOU CANNOT DO THIS. #DhakaLeague It’s a shame. pic.twitter.com/WPlO1cByZZ
— Saif Hasnat (@saifhasnat) June 11, 2021
त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अबाहानी लिमिटेडची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी आपले पहिले ३ गडी अवघ्या ९ धावांवर गमावले. त्यानंतर शाकिब गोलंदाजीसाठी आला. त्याच्या षटकातील एका चेंडूवर मुशफिकुर रहिम चकला व शाकिबने जोरदार अपील केले. मात्र, पंचांनी रहीमला बाद न दिल्याने शाकिब संतापला व त्याने स्टंपला लाथ मारली. तसेच तो पंचांशी देखील वाद घालत राहिला. अखेरीस सहकाऱ्यांनी त्याला समजावत बाजूला केले.
One more… Shakib completely lost his cool. Twice in a single game. #DhakaLeague Such a shame! Words fell short to describe these… Chih… pic.twitter.com/iUDxbDHcXZ
— Saif Hasnat (@saifhasnat) June 11, 2021
सामन्यात दुसऱ्यांदा केले असे कृत्य
पहिल्या घटनेनंतर पुन्हा एकदा पुढील षटकात त्याला संयम राखत आला नाही. मीड ऑफवरून क्षेत्ररक्षण करत असताना तो धावत पंचांकडे आला व रागाच्या भरात त्याने नॉन स्ट्राईकवरील तीनही स्टंप हाताने उखाडत खेळपट्टीवर फेकले. त्याच्या या कृत्या नंतर आता त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चाहत्यांकडून होऊ लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात प्रथमच निवड झालेल्या ऋतुराज गायकवाडने केले धोनीचे कौतुक, सांगितली ‘ही’ गोष्ट
एन्गिडी आणि नॉर्कीएचा कहर! वेस्ट इंडीजचा उडविला ९७ धावांत खुर्दा, दक्षिण आफ्रिकेला मिळाली आघाडी
‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आहे कोट्यावधी रुपयांचा मालक, कमाई पाहून व्हाल थक्क