वेस्ट इंडीज क्रिकेटसाठी रविवार (28 जानेवारी) खास ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गाबामध्ये खेळला गेला. सामन्याच्या चौथ्या दिवशी यजमान संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. शमार जोसेफ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रिटायर्ड हर्ट झाला होता. पण चौथ्या दिवशी त्याने दुखापतीचा कुठलाच विचार न करता वेस्ट इंडीजसाठी मॅच विनरची भूमिका पार पाडली.
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 2 बाद 60 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा दुसरा डाव 193 धावांमध्ये गुडाळला गेला होता. शमार जोसेफ शेवटच्या विकेटसाठी खेळत होता. पण डावातील 73व्या षटकात मिचेल स्टार्कने त्याला रिटायर्ड हर्ट केले. षटकातील तिसरा चेंडू स्टार्कने घातक यॉर्कर टाकला, जो थेट जोसेफच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर लागला. चेंडू पायाला लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून पायचीतची अपील केली गेली. पंचांनी देखील जोसेफला बाद दिले. पण कॅरेबियन अष्टपैलूने डीआरएस घेताना श्रणाचाही विलंब केला नाही. जोसेफने घेतलेला डीआरएस बरोबर निघाला आणि तो पायचीत झाला नाही, हे स्पष्ट झाले. असे असले तरी, त्याला फलंदाज करता येणार नव्हती. अंगठ्याला चेंडू लागल्यानंतर तो चालू देखील शकत नव्हता. अशात दोन खांद्याचा आधार देत काही खेळाडूंनी मैदानाबाहेर नेले. जोसेफने या डावात 3 धावांचे योगदान दिले.
Here’s the video 🥶pic.twitter.com/gEn8VF6EeO
— Cheems Bond (@Cheems_Bond_007) January 27, 2024
दुखापतीमुळे युवा खेळाडू गोलंदाजीसाठी मैदानात येईल, अशी शक्तता कमी होती. फण त्याने शेवटच्या डावात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोसेफने सामन्याच्या शेवटच्या डावात चौथ्या दिवशी एक-दोन किंवा तीन विकेट्स घेतल्या नाहीत. तब्बल सात विकेट्स नावावर करत त्याने यजमान ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. या सात विकेट्समध्ये कॅमरून ग्रीन (42), ट्रेविस हेड (0), मिचेल मार्श (10), ऍलेक्स केरी (2), मिचेल स्टार्क (21), पॅट कमिन्स (2) आणि जोश हेजलवूड (0) यांचा समावेश होता. ही कामगिरी करण्यासाठी शामार जोसेफने एकूण 11.5 षटके गोलंदाजी केली आणि 68 धावा खर्च केल्या. 5.74च्या इकॉनॉमीने त्याने धावा खर्च केल्या.
Yesterday – Hospital due to injured toe.
Today – Created history at Gabba.
Shamar Joseph, Take a bow – he has given a new life to West Indies Test cricket. 🫡 pic.twitter.com/2XeYWhlGnT
— Johns. (@CricCrazyJohns) January 28, 2024
उभय संघांतील या सामन्याचा एंकदरीत विचार केला, तर पहिल्या डावात 311, तर दुसऱ्या डावात 193 धावा केल्या होत्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात धाडसी निर्णय घेत 9 बाद 289 धावांवर डाव घोषित केला. दुसऱ्या डावात विजयासाठी मिळालेले 216 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलिया सहज गाठेल, असे वाटत होते. चौथ्या दिवशी त्यांना विजयासाठी 156 धावा हव्या होत्या आणि 8 विकेट्स देखील बाकी होत्या. पण कॅरेबियन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियन संघाने शरणागती पत्करली. एकडा स्टीव स्मित 91* धावांसह शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम होता. वेस्ट इंडीजला दुसऱ्या कसोटीत मिळालेल्या विजयानंतर मालिका 1-1 अशा बरोबरीत सुटली आहे. (Shamar Joseph took 7 wickets in the Gabba Test to defeat the Australian team)
महत्वाच्या बातम्या –
KIYG 2023: वेटलिफ्टर आरती ताटगुंटी, ए व्ही सुश्मिता यांनी राष्ट्रीय विक्रमासह जिंकलं सुवर्ण
AUS vs WI । कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर! कॅरेबियन गोलंदाजांकडून यजमान ऑस्ट्रेलियाला धक्का