आयपीएल (IPL) 2024 चे फायनलिस्ट सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघात बदलाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या हंगामात हैदराबाद संघाची कामगिरी अपेक्षेपेक्षा खूपच निराशाजनक राहिली, त्यामुळे हैदराबाद संघाने आपल्या प्रशिक्षक स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे. हैदराबाद (SRH) संघाने भारताचा माजी वेगवान गोलंदाज वरुण एरॉनला नवीन गोलंदाजी प्रशिक्षक (SRH गोलंदाजी प्रशिक्षक IPL 2026) म्हणून नियुक्त केलं आहे. त्यांनी गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स फ्रँकलिनची जागा घेतली आहे.
आता वरुण एरॉनचं (Varun Aaron) एक जुनं विधान चर्चेचं केंद्र बनलं आहे, जे त्यांनी आयपीएल (IPL) 2025 च्या काळात दिलं होतं. ईसपीन (ESPN) क्रिकइन्फोवर तज्ज्ञ म्हणून बोलताना त्यांनी मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) हैदराबाद संघातून रिलीज करण्याची भविष्यवाणी केली होती.
वरुण एरॉनने भविष्यवाणी करताना असं म्हटलं होतं की,
मी म्हणेन की मोहम्मद शमीला रिलीज केलं जाईल, कारण तो आपल्या करिअरच्या अखेरच्या टप्प्यावर आहे, त्याची फिटनेस घसरत आहे आणि कदाचित ईशान किशनलाही रिलीज केलं जाऊ शकतं. हैदराबादने ईशानला मोठी रक्कम देऊन खरेदी केलं होतं. त्या वेळी वरुण एरॉन तज्ज्ञ म्हणून आपला वैयक्तिक दृष्टिकोन मांडत होते आणि कोणत्याही संघाचा भाग नव्हते.
शमीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions trophy 2025) मध्ये जबरदस्त कामगिरी करत 9 विकेट घेतल्या होत्या. हैदराबाद संघाने त्याला 10 कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामील केलं होतं. पण आयपीएल (IPL) मध्ये त्याचा परफॉर्मन्स फारच खराब राहिला, जिथे त्याने 9 सामन्यांत फक्त 6 विकेट घेतल्या.
दुसरीकडे ईशान किशनबद्दल (Ishaan Kishan) बोलायचं झालं तर, मेगा लिलावमध्ये (SRH) फ्रँचायझीने त्याला 11.25 कोटी रुपये देऊन घेतलं होतं. 2025 च्या हंगामामध्ये त्याने 14 सामन्यांत 354 धावा केल्या होत्या, ज्यात फक्त एक शतक आणि एक अर्धशतक होतं.






