रविवारी (22 ऑक्टोबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला विश्वचषकातील 21 वा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. हा सामना धरमशाला येथे खेळण्यात आला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने निर्धारित षटकात सर्वबाद 273 धावसंख्या उभारली. भारताकडून विश्वचषक 2023 मधील आपला पहीला सामना खेळणार्या मोहम्मद शमीने सर्वाधिक 54 धावात 5 विकेट्स घेतल्या.
सामना संपल्यानंतर बोलताना मोहम्म्द शमी (Mohammad Shami) म्हणाला, “जर तुम्ही इतरांच्या यशाचा आनंद घेत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मी बेंचवर बसून सर्व काही पाहत होतो आणि संघ चांगली कामगिरी करत आहे, तुम्हाला बाहेर बसून रोष वाटू नये. प्रत्येकाने एकमेकांच्या यशाचा आनंद घेतला पाहिजे”.
शमीने आपल्या विश्वचषक कारकिर्दीत एकुण 36 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर तो भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा फलंदाज बनला आहे. पहील्या क्रमांकावर भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान (Zahir Khan) आहे, त्याने आपल्या विश्वचषक कारकिर्दीत एकुण 45 विकेट्स घेतल्या आहेत.
या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने हे लक्ष्य 48 षटकात 6 विकेट्स गमावून गाठले. यावेळी भारताकडून विरीट कोहली (Virat Kohli) याने सर्वाधिक 104 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 95 धावा केल्या. त्याचवरोबर विश्वचषक 2023 मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने या विश्वचषकात आतापर्यंत त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 118 च्या सरासरीने 354 धावा केल्या आहेत.
भारताचा विश्वचषक 2023 मधील हा सलग पाचवा विजय आहे. गुणतालिकेत भारत 10 गुणांसह पहील्या क्रमांकावर विराजमान आहे. विश्वचषक 2023 मधील भारताचा पुढील सामना 29 ऑक्टोबरला इंग्लंडविरूद्ध होणार आहे.
Shami on-target reaction after the match Said You sit outside
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी स्पर्धेत ‘ही’ उंची गाठणं येड्या गबाळ्यांच काम नाही, सचिन-गेलला न जमलेली कामगिरी विराटने केली
प्रिन्स ऑन टॉप! एकाच वेळी चार मातब्बरांना मागे सोडत केला नवा विक्रम