टीम इंडिया आज इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. ही माहिती भारताचे टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा आणि वेगाचा बादशहा मोहम्मद शमीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली आहे. गुरुवारी या दोन्ही खेळाडूंनी स्वदेशी सोशल मीडिया मंच ‘कू’वर एक फोटो शेयर करत इंग्लंडच्या टूरवर जाण्याबाबत सांगितले. पुजाराने आपल्या पोस्टला कॅप्शन दिली, “पुढच्या आव्हानासाठी तयार”
शमीने लिहिले:
इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने धमाल करणाऱ्या पुजाराचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे. याआधी श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्य सीरीजमध्ये त्याचा वाईट फॉर्म पाहून निवडकर्त्यांनी त्याला संघाच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता इंग्लंडच्या भूमीकडे निघण्याआधी चेतेश्वर पुजाराने काय पोस्ट केली आहे, ते बघूया
चेतेश्वर पुजाराने सोशल मीडिया मंच ‘कू’वर एक पोस्ट केली आहे. त्याच्यासोबत टीम इंडियाचे माजी कर्णधार विराट कोहली, रवींद्र जडेजा, शुभमन गिल, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा हेसुद्धा दिसत आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुजाराने लिहिले, “पुढच्या आव्हानासाठी तयार, ब्रिटेन बॉन्ड.”
रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये मध्ये टीम इंडिया गुरुवारी इंग्लंडसाठी निघते आहे. भारतीय टीमला इंग्लंडच्या दौऱ्यावर एक टेस्ट सामना, तीन टी20 आणि तीन वनडे सामने खेळायचे आहेत. टेस्ट सामन्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. सगळे खेळाडू मुंबईला पोचत आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, पूर्व कर्णधार विराट कोहली आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आधीच मुंबईत आहेत.
यासोबतच मोहम्मद शमी, केएस भरत आणि चेतेश्वर पुजारासारखे खेळाडूसुद्धा लंडनला जाण्यासाठी मुंबईला पोचले आहेत. सध्या याबाबत काही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही, की के एल राहुल या विदेश दौऱ्यावर सोबत जातील अथवा नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘राहुल अनुपस्थित असेल तर, रोहित विराट काय कामाचे नाहीत’, भारताच्या माजी दिग्गजाने व्यक्त केली खदखद
नेटमधला तो चेंडू राहुलला पडला भलताच महागात; उपचारासाठी जावे लागणार ‘या’ देशात
‘आता दबाव आफ्रिकी संघावर’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने दिले भारतीय संघाला बळ