साउथँम्पटन। शनिवारी(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात पार पडला. शेवटच्या षटकापर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात भारताने 11 धावांनी विजय मिळवला. तसेच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात हॅट्रिक घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
या सामन्यात अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज होती. तसेच त्यांच्या हातात 3 विकेट्स बाकी होत्या. हे षटक भारताकडून शमीने टाकले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने चौकार मारला होता.
पण त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला. तर तिसऱ्या चेंडूवर शमीने 52 धावांवर खेळणाऱ्या नबीला बाद केले. त्याच्या पुढील दोन चेंडूवर शमीने अनुक्रमे अफताब आलम आणि मुजीब उर रेहमानला त्रिफळाचीत केले आणि त्याची विश्वचषकातील पहिली हॅट्रिक साजरी केली. ही या विश्वचषकातीलही पहिलीच हॅट्रिक आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 224 धावा करत अफगाणिस्तान समोर विजयासाठी 225 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 67 धावांची तर केदार जाधवने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.
तसेच गोलंदाजीत अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नाईबने आणि मोहम्मद नाबीने प्रत्येकी 2 विकेट घेतली; तसेच राशिद खान, रेहमत शहा, मुजीब उर रेहमान आणि अफताब आलमने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने चांगली सुरुवात केली होती. त्यांच्याकडून रेहमत शहा(36) आणि कर्णधार गुलाबदीन नाईबने(27) दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. तर नाईब बाद झाल्यानंतर शहा आणि हशमततुल्लाह शाहीदीने(21) तिसऱ्या विकेटसाठी 42 धांवांची भागीदारी रचली.
पण शहा आणि शाहिदी या दोघांनाही जसप्रीत बुमराहने बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर नियमित कालांतराने अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी विकेट गमावल्या.
पण नबीने अर्धशतक करत अफगाणिस्तानकडून एकाकी झुंज कायम ठेवली होती. मात्र त्याला शमीने बाद करत नंतर अफगाणिस्तानचा डावही संपवला. त्यामुळे अफगाणिस्तानला 49.5 षटकात सर्वबाद 213 धावाच करता आल्या.
भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर बुमराहने महत्त्वाच्या 2 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे बुमराहला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर या दोघां व्यतिरिक्त युजवेंद्र चहल आणि हार्दिक पंड्यानेही प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
But it was India's pace duo that had the last laugh with @Jaspritbumrah93 adjudged Player of the Match and @MdShami11 taking a hat-trick to seal victory.
See all of the wickets here 👇#TeamIndia | #CWC19 pic.twitter.com/MAlVGTmUlC
— ICC (@ICC) June 22, 2019
What a way to end it @MdShami11! 🎩🎩🎩
Nabi c Pandya b Shami
Alam b Shami
Ur Rahman b ShamiIndia take an absolute thriller by 11 runs.
Watch the winning (and hat-trick) moment here!#INDvAFG | #TeamIndia | #CWC19 pic.twitter.com/q9fYvcR56z
— ICC (@ICC) June 22, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–२७ वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने विश्वचषकात केली अशी कामगिरी
–वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदाच घडली अशी घटना!
–एमएस धोनीच्या बाबतीत केवळ दुसऱ्यांदाच घडली अशी गोष्ट