भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात १८ ते २२ जून दरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना साऊथॅम्पटन येथे होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, ही पहिलीच कसोटी अजिंक्यपद स्पर्धा असल्याने सर्वांनाच या सामन्याबद्दल उत्सुकता आहे. या सामन्याबद्दल अनेक दिग्गजांनी विविध मते देखील व्यक्त केली आहेत. आता यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बॉन्डचा देखील समावेश झाला आहे. परंतु, शेन बॉन्डने एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.
रोहित शर्मा आणि ट्रेंट बोल्ट हे दोघेही आईपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या एकाच संघाचे प्रतिनिधित्व करतात. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डने एक मजेशीर रहस्य उघड केले आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शेन बॉन्ड सांगतो की, “आयपीएलच्या वेळेस रोहित आणि ट्रेंट बोल्ट हे दोघेही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची चर्चा कताना दिसायचे. असेच एकदा नेट सरावादरम्यान, ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला गोलंदाजी करत होता, त्यावेळेस त्याने टाकलेला चेंडू आत आला आणि रोहितच्या पॅडला जाऊन लागला. अशातच ट्रेंट बोल्टने, रोहितला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याची झलक दाखवली. जेवढे दृश्य मी पहिले त्यामध्ये ट्रेंट बोल्ट एकसारीख गोलंदाजी करत होता आणि रोहितला सांगत होता की, हे दृश्य मी तुला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात दाखवणार आहे.”
शेन बॉन्ड सांगतो की, “भारतीय सलामी फलंदाज रोहित शर्मा एक आक्रमक फलंदाज आहे. तो एक जलदगतीने धावा करणारा फलंदाज आहे. जो जगतील कुठल्याही विरोधी संघाविरुद्ध धावा करू शकतो.”
शेन बॉन्ड पुढे सांगतो, “मी एक खेळाडूच्या रुपात रोहित शर्मावर प्रेम करतो. मी त्याला मॅथ्यू हेडन सारखा खेळाडू मानतो. जो कठीण खेळपट्टीवरसुद्धा चांगला खेळ करतो आणि स्वत:ला सिद्ध करतो. तो स्वत:हून पुढे येऊन जलदगतीने धावा करतो. तो कठीण काळात रिषभ पंत सारखी फलंदाजी करतो.”
शेन बॉन्ड सांगतो की, “अंतिम सामन्यात अशा काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंड संघाचे पारडे जरा जास्त जड आहे. परंतु, रोहित शर्मा जलदगतीने धावा करतो. त्यामुळे गोलंदाजांवर आपोआप दबाव येतो. मी या अंतिम सामन्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहे आणि खास करून मस्करीमध्ये झालेला ट्रेंट बोल्ट आणि रोहित शर्माचा किस्सा मला खरा अनुभवायचा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माला WTC फायनलपूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणचा ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ सल्ला
WTC फायनलसाठी कशी असायला हवी भारताची फलंदाजी क्रमवारी? व्हीव्हीएस लक्ष्मणने दिले ‘हे’ उत्तर
WTC फायनलमध्ये ‘मोठे’ विक्रम करण्याची विराट कोहली, रोहित शर्माला सुवर्णसंधी






