आॅस्ट्रेलियाचा माजी महान फिरकी गोलंदाज शेन वाॅर्नने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वाॅ हा सगळ्यात स्वार्थी खेळाडू असल्याचे त्याने म्हटले आहे. या फिरकी गोलंदाजाचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यात त्याने हे आरोप केले आहेत.
त्या ऐतिहासिक काळातून सर्वजन जात होते. त्यात जस्टीन लॅंगर, मॅथ्यू हेडन, अॅडम गिलख्रिस्ट हे होते परंतू आपण त्यात नव्हतो, असे त्याने आपल्या पुस्तकात लिहले आहे.
वाॅर्नने आपल्या पुस्तकात लिहले आहे की, 1999 वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यात मला खराब फाॅर्मसाठी संघातून वगळण्यात आले होते. तेव्हा मी संघाचा उपकर्णधार आणि चांगली गोलंदाजी करत होतो. वाॅने मी, तो आणि संघाचे प्रशिक्षक जाॅफ मार्श यांची बैठक घेतली आणि तु पुढच्या सामन्यात खेळशील असे मला वाटत नाही असे सांगितले.
त्यानंतर तो म्हणाला कि तु चांगली गोलंदीजी करत नाहीस. मला वाटल होत कि तु खांद्याच्या दुखापतीमधून सावरला असशील मात्र तुला पहिल्या सारखी गोलंदाजी करायला अजून वेळ लागेल असे वाॅने पुन्हा म्हटल्याचे वाॅर्नने आपल्या पुस्तकात लिहले आहे.
त्यावेळी मला प्रशिक्षक मार्श आणि निवड समितीचेे अध्यक्ष अॅलन बाॅर्डर यांचा पाठींबा होता. त्याने केलेला तिखट शब्दाचाच मारा नाही तर त्याने आपल्या पडत्या काळात आधारसुद्धा दिला नाही त्यामुळे आपण पुर्ण कोसळलो होतो असेही वाॅर्नने आपल्या पुस्तकात लिहले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-५० कसोटी खेळलेला पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू करतोय पुनरागमन
-राजकोट कसोटीपुर्वी विंडीजला मोठा धक्का, तब्बल ४८ कसोटी खेळलेला खेळाडू संघाबाहेर
-करुण नायरने करुन दाखवले, विराटलाही मागे टाकले