ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वाॅर्नला (Shane Warne) ओव्हर स्पीडिंग (वेगाने गाडी चालवणे) चार्ज मुळे 12 महिन्यांसाठी वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
शेन वार्नने आपली चुक मान्य केली आहे. विम्बल्डन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टाने त्याला ही शिक्षा सुनावली आहे.
गेल्या वर्षी केन्सिंग्टन येथे भाड्याने घेतलेली जॅग्वार कार 40 माईल्स पर आवर (ताशी 40 माईल वेगाने) पेक्षा जास्त वेगाने चालविली होती.
या सुनावणीसाठी 50 वर्षीय शेन वाॅर्न न्यायालयात हजर नव्हता. 23 ऑगस्ट 2019 रो़जी पहाटे 6.29 वाजता स्लिप रोडवर 40 माईल्स पर आवर (ताशी 40 माईल वेगाने) पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवत होता.
शतकातील सर्वोत्तम चेंडू टाकणाऱ्या या दिग्गज फिरकी गोलंदाजावर आजपर्यंत 5 वेळा अशी चुक केली आहे परंतु यापुर्वी त्याला अशी शिक्षा झाली नव्हती.
त्याला एकूण 1845 युरोची शिक्षाही ठोठाविण्यात आली आहे.
शेन वार्न हा ऑस्ट्रेलियाचा महान माजी गोलंदाज असून त्याने 145 कसोटी सामन्यात तब्बल 708 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या तो बऱ्याच वेळा समालोचकाच्या भुमिकेत पहाय़ला मिळतो.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ती घटना ज्यामुळे विराटला मिळाली आयसीसीकडून शिक्षा, पहा व्हिडिओ
–अनुभवी तमिळ थलायवाज प्ले-ऑफमधून बाहेर, तर हे दोन संघ प्ले-ऑफसाठी ठरले पात्र
–या मोठ्या दौऱ्यासाठी इंग्लंड संघाची घोषणा, दोन मोठ्या खेळाडूंना वगळले…