---Advertisement---

अश्विनला दोषी ठरवणाऱ्या वॉर्नला भारतीय चाहत्यांनी दाखवला आरसा; करून दिली ‘त्या’ प्रकरणाची आठवण

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या ४१ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार ओएन मॉर्गन यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्ध झाले आणि हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. राहुल त्रिपाठीचा थ्रो पंतच्या बॅटला धडकला आणि चेंडू क्षेत्ररक्षकांपासून दूर गेला, त्यानंतर अश्विन आणि दिल्लीच्या कर्णधाराने दोन धावा घेतल्या. यामुळे केकेआरचा कर्णधार मॉर्गन आणि वेगवान गोलंदाज टीम साऊथी संतप्त झाले. या दोघांनी अश्विनशी वाद घालण्यास सुरुवात केली. अश्विन सुद्धा खूप आक्रमक पद्धतीने काहीतरी बोलताना दिसला आणि यानंतर दिनेश कार्तिकने वाद संपवला. मात्र, आता ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने हा वाद पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न केला आहे.

वॉर्नने केले असे ट्विट

शेन वॉर्नने अश्विनच्या विरोधात ट्विटरवर लिहिले आहे. हे ट्विट वाचल्यानंतर चाहते आता त्याला ट्रोल करत आहेत. शेन वॉर्नने अश्विनला या संपूर्ण प्रकरणात चुकीचे म्हटले आणि मॉर्गनला योग्य ठरवले. शेन वॉर्नने लिहिले की, ‘या विषयावर दोन गट पडता कामा नये. हे लज्जास्पद आहे आणि असे कधीही घडता कामा नये. ओएन मॉर्गनला अश्विनच्या विरोधात बोलण्याचा पूर्ण अधिकार होता.’

 

सॅम्युअल्स प्रकरणाची करून दिली आठवण

अश्विनला ज्ञान दिल्यानंतर शेन वॉर्नला चाहत्यांनी मार्लन सॅम्युअल्स सोबत केलेल्या कृत्याची आठवण करून दिली आहे.

सन २०१३ मध्ये बिग बॅश लीगच्या एका सामन्यात शेन वॉर्नने सॅम्युअल्सला भर मैदानावर शिवीगाळ केली होती. वॉर्नने त्याची कॉलर देखील पकडली होती. यानंतर, वॉर्नने त्याच्या दिशेने एक थ्रो फेकला, ज्यामुळे सॅम्युअल्स संतप्त झाला आणि त्याने रागात आपली बॅट फेकली होती. शेन वॉर्नला त्यावेळी खूप टीकेला सामोरे जावे लागले होते आणि आता हा खेळाडू अश्विनला दोष देत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---