---Advertisement---

आयपीएल२०२० साठी राजस्थान रॉयल्सने ‘या’ दिग्गजाकडे दिली मोठी जबाबदारी

On: सोमवार, सप्टेंबर 14, 2020 2:29 PM
---Advertisement---

मुंबई । ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याची इंडियन प्रीमियर लीग टीम राजस्थान रॉयल्सने मेंटोर (मार्गदर्शक) म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच तो फ्रेंचायझीचा ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ असेल. 2008 मध्ये फ्रेंचायझी सुरू झाल्यापासून वॉर्न राजस्थान रॉयल्सशी संबंधित आहे आणि त्याने त्याच्या नेतृत्वाखालीच पहिल्या वर्षी राजस्थान संघाला एकमेव इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपदही मिळवून दिले होते.

वॉर्न आता राजस्थानचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्डबरोबर काम करेल. हे दोघांनीही 2003-07 पर्यंत तो व्हिक्टोरिया संघासोबत काम केले आहेत. वॉर्नने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, “माझ्या दुहेरी भूमिकेबाबत सांगताना मला वाटते की, रॉयल्स बरोबर राहणे नेहमीच चांगले वाटले आहे. माझा संघ माझा परिवार. ज्या फ्रेंचायजी वर मी इतके प्रेम करतो त्याच्यासोबत कोणत्याही स्तरावर काम करणे रोमांचकारी असेल.”

विशेष म्हणजे दीर्घ प्रतीक्षेनंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे वेळापत्रक 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गतवर्षीच्या उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज संघात अबू धाबी येथे 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. भारतातील कोविड -१९च्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) तीन ठिकाणी दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे यावर्षी जगातील सर्वात मोठी टी 20 लीग होत आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब दुसर्‍या दिवशी दुबईमध्ये आमनेसामने असतील तर 21 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी शारजाहमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान खेळला जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---