---Advertisement---

भारतीय संघ या मालिकेत ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक चांगला खेळला, ‘या’ माजी दिग्गजाने केले कौतुक

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 11:57 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर- गावसकर मालिकेमध्ये दोन्ही संघांकडून उत्तम क्रिकेटचा संघर्ष बघायला मिळत आहे. विशेषतः विपरीत परिस्थितीत देखील भारतीय संघाने ज्याप्रकारे लढण्याची जिद्द दाखवली ती बघून सर्वच क्रिकेटरसिकांना आनंद झालेला आहे. यादरम्यानच ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू शेन वॉर्न यांनी देखील भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना वॉर्न म्हणाले, “माझ्या मते भारतीय संघ या मालिकेमध्ये सर्वोत्तम राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियन संघाकडे मालिका विजय मिळवण्याच्या अनेक संधी आल्या, पण त्यांनी त्या गमावल्या. अनेक वेळी संघाची रणनीती योग्य नव्हती व यामुळे त्यांच्या कामगिरीवर परिणाम झाला.काही महत्वाच्या क्षणी त्यांनी उत्तम कामगिरी केली नाही. टीम पेनची विकेट किपिंग देखील खराब राहिलेली आहे.”

शेन वॉर्न यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजी बद्दल देखील तिखट प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्न म्हणाले, “सामन्यात केवळ कर्णधाराची चूक नसते तर वाईट परिस्थितीला गोलंदाज देखील तितकेच जबाबदार असतात. गोलंदाज कर्णधाराला सांगू शकतात की त्यांना कशा प्रकारची फिल्डिंग हवी आहे, व ते त्यानुसार रणनीती आखू शकतात.ऑस्ट्रेलियन संघाने ज्याप्रकारे सिडनी कसोटीत व ब्रिस्बेन येथील तिस-या दिवशी रणनीती आखली ती समजले मला अवघड जात आहे.”

महत्वाच्या बातम्या:

रणजी स्पर्धेच्या आयोजनावरून बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद, सौरव गांगुली या मतावर ठाम

आयपीएल २०२१ : सुरेश रैनाला मिळणार चेन्नई संघातून डच्चू?

असे दोन प्रसंग, जेव्हा भारतीय संघाने चौथ्या डावात यशस्वीरित्या पार केले 300 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---