मुंबई । इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझींपैकी एक म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज. या संघाचा उपकर्णधार आणि मुख्य खेळाडू सुरेश रैनाने संघाचे 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली आहे. दरम्यान, सुरेश रैना आयपीएलमधून बाहेर पडल्यावर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज शेन वॉटसनने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्याने सांगितले की, रैनाची जागा भरुन काढणे चेन्नई सुपर किंग्जला कठीण जाईल.
शेन वॉटसनने यूट्यूब कार्यक्रमात क्वेटा ग्लेडिएटर्सचा महत्त्वाचा खेळाडू नबिल हाश्मीला सांगितले की, रैना आणि हरभजन सिंग यांच्या अनुपस्थितीचा सामना करावा लागला. तो म्हणाला, “सीएसकेची एक चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या संघात फलंदाजांची फळी मोठी आहे. पण रैनाची जागा भरून काढणे निश्चितपणे अवघड आहे.”
रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळले आहेत. अनेक विक्रमही स्वतःच्या नावावर केले आहेत.
“युएईची परिस्थिती पाहता येथील हवामान उष्णता आहे. त्यामुळे खेळपट्टी अधिक कोरडी होण्याची शक्यता आहे. रैना चांगली फिरकी गोलंदाजी करतो. आयपीएलमधून माघार घेतल्यानंतरही रैनाचा सराव सुरूच आहे आणि त्याने माघारी येण्याचे संकेतही दिले. परंतु रैनाच्या परतण्याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही,” असेही शेन वॉटसन याने सांगितले.






