ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन हा सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासोबत सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. नुकतीच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फॅब ५ ची निवड केली आहे. विशेष म्हणजे, त्याच्या या फॅब ५ मध्ये एक भारतीय क्रिकेटपटूही असून तो अजून कोणी नव्हे विराट कोहली आहे. त्यातही वॉटसनने विराटला फॅब ५ मध्ये अव्वलस्थान दिले आहे.
मागील ३ वर्षांपासून लौकिसास साजेसे प्रदर्शन करण्यात अपयशी ठरत असलेल्या विराटला (Virat Kohli) निवडण्यामागचे कारण सांगताना वॉटसन (Shane Watson) म्हणाला की, “विराट सुपरह्युमन आहे. त्याने आतापर्यंत जे काही साध्य केले आहे, ते यासाठी की, तो जेव्हाही मैदानावर उतरतो, तेव्हा खूप उर्जेने खेळतो.”
विराटनंतर वॉटसनने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. बाबरचे कौतुक करताना वॉटसन म्हणाला की, “ज्या प्रकारे त्याने त्याच्या खेळाशी स्वतला जुळवून घेतले आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन दाखवले, ते शानदार आहे. तो सध्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसरा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
तसेच वॉटसनने कसोटी क्रिकेटमधील फॅब ५ मध्ये (Fab 5)ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला (Steve Smith) तिसरा सर्वश्रेष्ट फलंदाज म्हटले आहे. असे वाटत आहे की, “स्मिथने खेळपट्टीवर अधिक वेळ घालण्याचे ठरवले आहे आणि तो गोलंदाजांवर जास्त दबाव टाकताना दिसत नाहीय, जितका तो आधी टाकायचा. म्हणून माझ्यासाठी स्मिथ या यादीत थोड्या खालच्या क्रमांकावर घसरला आहे,” असे स्मिथच्या निवडीबद्दल बोलताना वॉटसन म्हणाला. चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला (Kane Williamson) निवडत वॉटसनने सांगितले की, “केनला त्याच्या खेळाशी चांगलीच जाण आहे. त्याला माहिती असते की, कोणत्या परिस्थितीत कशा गोलंदाजांवर दबाव निर्माण केला जाऊ शकतो.”
याशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रूटला (Joe Root) सर्वात खालच्या क्रमांकावर अर्थात पाचव्या क्रमांकावर स्थान दिले गेले आहे. यामागचे कारण सांगताना वॉटसन म्हणाला की, “जो रूटने नुकतेच शतक ठोकले आहे. परंतु तो मागील काही काळापासून स्मिथसारखाच खेळत आहे, जिथे तो पूर्वीप्रमाणे मोठ्या धावा करू शकत नाहीय.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या विजयासाठी भुकेली मुंबई इंडियन्स ५ पराभवांनंतरही प्लेऑफसाठी बनू शकते पात्र, पाहा समीकरणे
‘आम्ही चांगले क्रिकेट खेळत नाहीये’, मुंबईच्या सलग ५ व्या पराभवानंतर कर्णधार रोहितचे स्पष्टीकरण
RR vs GT: राजस्थानचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघ एक बदलासह अव्वलस्थानासाठी देणार झुंज