ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज अष्टपैलू शेन वॉटसन याने केएल राहुल याचे तोंड भरून कौतुक केले आहे. केएल राहुल दुखापतीतून सावरल्यानंतर आशिया चषक 2022 मध्ये खेळला. पुनरागमन केले असले तरी, राहुल त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसत नाहीये. शेन वॉटसनच्या मते गमावण्यासाठी काहीच नाहीये, या विचाराने जेव्हा राहुल फलंदाजी करतो, तेव्हा तो सर्वोत्तम प्रदर्शन करतो.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. विश्वचषकाची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून होणार असून भारताला पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. शेन वॉटसन (Shane Watson) याच्या मते भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याने टी-20 विश्वचषकात चांगली फलंदाजी करावी. दरम्यान, मागच्या महिन्यात खेळल्या गेलेल्या आशिया चषकात आणि त्यानंतर खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत राहुलचा स्ट्राईक रेट खूपच सामान्य राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला विजयासाठी 107 धावा करायच्या होत्या. राहुलने या सामन्यात 56 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या होत्या. या धावा त्याने अवघ्या 91.07 च्या स्ट्राईक रेटने केल्या.
वॉटसनच्या मते केएल राहुलने पहिल्या चेंडूपासून आक्रमाक फलंदाजीला सुरुवात केली पाहिजे. पीटीआयशी बोलताना वॉटसन म्हणाला, “केएल राहुल माझा आवडता फलंदाज आहे. त्याला खेळताना पाहायला मला आवडते. माझ्या मते राहुल तेव्हाच त्याची सर्वोत्तम फलंदाजी करतो, जेव्हा तो आक्रमक फलंदाजी करतो. तो स्वतःडा डाव पुढे घेऊन जातो आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नही करतो.”
“त्याला फलंदाजी करताना पाहायला मला आवडते. जेव्हा त्याला असे वाटते की, त्याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाहीये, तेव्हाच तो अधिक जोखीम न घेताच 180 च्या स्ट्राईक रेटने धावा करू शकतो. जर त्याने ऑस्ट्रेलियात असे करू शकला, तर खूप गोलंदाज अडचणीत येतील,” असेही वॉटसन पुढे बोलताना म्हणाला. दरम्यान, राहुलने आफ्रिकी संघाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…
टी20 विश्वचषक 2022: दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने शमी-सिराजच्या तयारीची उडवली खिल्ली