चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रविवारी (४ ऑक्टोबर) झालेला आयपीएल २०२०चा १८वा सामना खूप रोमांचक ठरला. दुबई येथे झालेल्या या सामन्यात पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात १७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईनेही दमदार फलंदाजी करत आणि एकही विकेट न गमावता केवळ १७.४ षटकात पंजाबचे आव्हान पूर्ण केले.
दरम्यान चेन्नईच्या विजयाचा नायक ठरलेल्या शेन वॉटसनने एक शानदार विक्रम केला आहे. त्याने सलामीला फलंदाजीसाठी येत १५६.६०च्या स्ट्राईक रेटने चौफेर फटकेबाजी करत ८३ धावा कुटल्या. फक्त ५३ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकार मारत त्याने ही धावसंख्या केली.
अशात वॉटसनने मारलेल्या ३ षटकारांपैकी एक षटकार १०१ मीटर दूरपर्यंत गेला. हा आयपीएल २०२०मधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब गेलेला षटकार ठरला. त्याच्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने सर्वात लांब षटकार ठोकला होता. त्यावेळी त्याने मारलेला चेंडू मैदानाबाहेर १०५ मीटर दूर गेला होता.
तर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यर (९९ मीटर), निकोलस पूरन (९७ मीटर) आणि कायरन पोलार्ड (९७ व ९६ मीटर) यांनीही आयपीएलच्या या हंगामात मोठे षटकार लगावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे माही! यष्टीमागेही ठरला किंग, पूर्ण केली कॅचची ‘सेंच्यूरी’
मुंबईच्या धडाकेबाज विजयानंतर सोशल मीडियावर अशा उमटल्या प्रतिक्रिया
हैदराबादला धूळ चारत मुंबईचा ३८ धावांनी विजय; घेतली अव्वल क्रमांकावर उडी
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरने राजस्थानविरुद्धचा सामना एकहाती जिंकला; पाहा राजस्थानच्या पराभवाची ३ प्रमुख कारणे
विजयासाठी आसुसलेल्या चेन्नईला हरवायचंय.. पंजाबला करावे लागतील ३ महत्वाचे बदल….
आयपीएलमध्ये १५० बळींचा टप्पा गाठणारे गोलंदाज, चारपैकी तीनही भारतीय फिरकीपटू