-अनिल भोईर
आज १५ जुलै, कबड्डीला विशेष महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या व्यक्तीचा आज जन्मदिवस. १५ जुलै १९३२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात शंकरराव साळवी (बुवा) यांचा जन्म झाला. आपलं आयुष्य कबड्डीसाठी वाहून देणारे बुवा साळवी यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात “कबड्डी दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.
बुवा साळवींनी आपलं पूर्ण आयुष्य कबड्डीला महत्व प्राप्त करून देण्यासाठी दिले. “हुतुतू” हा नऊ खेळाडूंचा असलेल्या खेळाला सात खेळाडूंचा “कबड्डी” खेळ म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी बुवांनी खूप संघर्ष केला होता.
या प्रवासात अनेक विरोधक तयार झाले, मुळात “कबड्डी” या शब्दाला काहींचा विरोध होता. पण तेव्हा बुवांनी संपूर्ण भारत फिरून नाराज खेळाडूंची समजूत काढली.
बुवा साळवी हे महाराष्ट्र कबड्डीचे महत्वाचे आधारस्तंभ होते. तसेच अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे तहह्यात अध्यक्ष होते. त्याना महाराष्ट्र शासनाचा कबड्डी संघटक म्हणून शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बुवांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. १९९० साली आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच कबड्डी खेळाचा समावेश करण्यात आला. बुवाचं हे खूप मोठे यश होत. सुरुवातीला भारत, पाकिस्तान, बांगलादेश, जपान या देशांनी कबड्डी खेळायला सुरुवात केली. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास ३० देश कबड्डी हा खेळ खेळत आहेत.
१९९० पासून ते आतापर्यंत झालेल्या सात आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने सात वेळा सुवर्णपदक पटकावले आहे, तर महिलांच्या झालेल्या दोन स्पर्धेत सुद्धा भारताने सुवर्णपदक पटाकवले आहेत.
शंकरराव बुवा साळवींनी आपले संपूर्ण आयुष्य कबड्डीसाठी अर्पण केले होते. वयाच्या ७५ व्या वर्षी १५ फेब्रुवारी २००७ ला त्याचं देहावसान झालं. कबड्डीसाठी झटण्याऱ्या बुवांचा जन्मदिवस महाराष्ट्रात “कबड्डी दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. २००१ पासून कबड्डी दिन साजरा करण्यात येत असून यंदा १८ व्या कबड्डी दिन परभणी जिल्हात साजरा केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने १८ व्या कबड्डी दिना निमित्ताने जाहीर झालेले विशेष पुरस्कार;
राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंन मधुन शिष्यवृत्ती:
किशोर गट:
१) कु. करण धर्मेंद्र भगत (रायगड)
२) कु. विश्वजीत सुभाष परीट (कोल्हापूर)
३) कु. हनुमान ज्ञानबा शिंदे (परभणी)
किशोरी गट:
१) कु. शुभदा सुधीर खोत (मुंबई उपनगर)
२) कु. ऋतुजा वसंतराव कडलगे (कोल्हापूर)
३) कु. रुणाली प्रशांत भुवड (मुंबई शहर)
कुमार गट:
१) कु. मनोज महादेव चव्हाण (कोल्हापूर)
२) कु. शुभम शशिकांत शिंदे (रत्नागिरी)
३) कु. सतपाल रमेश कुमावत (सांगली)
कुमारी गट:
१) कु. सोनाली रामचंद्र हेलवी (सातारा)
२) कु. मानसी ज्ञानेश्वर रोडे (पुणे)
३) कु. आसावरी बाबासो खोचरे (कोल्हापूर)
कुमार/कुमारी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंमधून विशेष शिष्यवृत्ती:
१) कु. तेजस संतोष शिंदे (मुंबई शहर)
२) कु. राधा विलास मोरे (पुणे)
वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागी खेळाडूंमधून उत्कृष्ट खेळाडू:
पुरुष- श्री. सिद्धार्थ मिलिंद देसाई (पुणे)
महिला- कु. सायली उदय जाधव (मुंबई उपनगर)
वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी खेळाडून मधून विशेष पुरस्कार:
स्व. मधु पाटील स्मृती पुरस्कार
१) श्री. रिशांक कृष्णा देवडिगा (मुंबई उपनगर)
२) श्री. गिरीश मारुती इरनक (ठाणे)
स्व. अरुणा साटम स्मृती पुरस्कार
१) कु. सायली संजय करिपाले (पुणे)
राज्य संघटने कडून विशेष पुरस्कार:
कृतज्ञता पुरस्कार:
१) श्री. मनोहर इंदुलकर (मुंबई शहर)
२) श्री. सुरेश वरपूडकर (परभणी)
जेष्ठ कार्यकर्ता पुरस्कार:
१) श्री. दिबंगर शिरवाडकर (मुंबई शहर)
२) श्री. सुरेश तरे (ठाणे)
३) श्री. गणपत लाड (मुंबई उपनगर)
४) श्री. भीमराव निर्वाळ (परभणी)
जेष्ठ खेळाडू पुरस्कार:
१) श्री. मरगु जाधव (सोलापूर)
२) श्री. जब्बार शेख (औरंगाबाद)
३) श्री. विजय खैरे (पुणे)
४) सौ. जयश्री झेंडे (पुणे)
जेष्ठ पंच पुरस्कार:
१) श्री. अंकुश पाताडे (मुंबई शहर)
२) श्री. मधुकर बोरसे (औरंगाबाद)
३) श्री. भगवान पवार (कोल्हापूर)
राज्य पंच परीक्षेत प्रथम क्रमांक:
डॉ. श्री. भालचंद्र रामकृष्ण मोरे (धुळे)
कै. रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ते पुरस्कार:
श्री. बुरानुद्दीन शेख (कोल्हापूर)
जेष्ठ क्रीडा पत्रकार:
१) श्री. मिलिंद ढमढेंरे (लोकसत्ता)
२) श्री. नरेश गुजराथी (सामना)
३) श्री. शिवाजी वाघमारे (सकाळ)
राज्यात गुणानुकर्मे प्रथम जिल्हा:
कोल्हापूर जिल्हा
उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा:
सातारा जिल्हा (लिबर्टी मजदूर मंडळ, कराड)