मुंबई । इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात झाली. तब्बल 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. क्रिकेट फॅन्सला मार्च नंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहता आला.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ 17.4 षटकांचा खेळ झाला. पहिल्या दिवसाअखेर 1 बाद इंग्लंडने 35 धावा केल्या.
या सामन्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करून इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले. सामन्याच्या दहाव्या चेंडूवर वेस्ट इंडिजने बालीचे पहिले खाते खोलले. शेनॉन गॅब्रियल याने एक सुरेख चेंडू टाकत इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ले याला त्रिफळाचीत केले.
चेंडू इतका भेदक होता की बाद झाल्यानंतर फलंदाज पाहात राहिला. शेनॉन गॅब्रिएलच्या गोलंदाजीपुढे कोणतेच उत्तर नव्हते. डॉम सिब्ले हा खाते देखील उघडू शकला नाही. शून्यावर बाद होताच सिब्ले हैराण झाला.
First wicket in international cricket which started after a long #Covid19 break#Sibley clean bowled by #ShannonGabriel that too golden duck out… pic.twitter.com/Vm6DV77YZb
— michael arun (@michaelarun_m) July 8, 2020
Bowled on the angle – Gabriel cleans out Sibley for a duck!
England 0-1 after 10 balls! #EngvWI
Watch live on Sky Sports Cricket now or follow here: https://t.co/ZUqX1InU7t pic.twitter.com/BZK5hSy9nl
— Sky Sports Cricket (@SkyCricket) July 8, 2020
अनेक दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाल्यानंतर धावा न काढता आल्याने ड्रेसिंग रुममध्ये निराश भावनेने तो परतला. अखेर दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ 204 धावांवर आटोपला.