पुणे: पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित 8 व 10 वर्षाखालील गटातील आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज2018 स्पर्धेच्या चौथ्या मालिकेत आर्यन किर्तने, शार्दुल खवले व प्रिशा शिंदे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद संपादन केले.
महाराष्ट्र मंडळ कटारीया हायस्कुल, मुकुंद नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मिश्र गटात दुस-या मानांकीत आर्यन किर्तनेने अव्वल मानांकीत रित्सा कोंदकरचा 7-1 असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले.
उपांत्य फेरीत आर्यन किर्तनेने तिस-या मानांकीत सुजय देशमुखचा 6-2 असा पराभव केला. आठ वर्षीय आर्यन बिशप्स स्कुल कॅम्प येथे दुस-या इयत्तेत शिकत असून, पीवायसी हिंदु जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
10 वर्षाखालील मुलांच्या गटात संघर्षपुर्ण लढतीत पाचव्या मानांकीत शार्दुल खवलेने अव्वल मानांकीत सक्षम भन्साळीचा 7-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
उपांत्य फेरीच्या सामन्यात शार्दुलने आठव्या मानांकीत देवराज मंदाडेचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत सहज विजयासह अंतिम फेरी गाठली.
शार्दुल वॉलनट स्कुल येथे चौथ्या इयत्तेत शिकत असून, डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक मदन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याचे या वर्षातील हे पहिले विजेतेपद आहे.
10 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकीत प्रिशा शिंदेने दुस-या मानांकीत मृणाल शेळकेचा 7-1 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले.
उपांत्य फेरीच्या लढतीत प्रिशाने रित्सा कोंदकरचा 6-2 असा पराभव केला. नऊ वर्षीय प्रिशा संस्कृती इंग्रजी माध्यम शाळा येथे चौथ्या इयत्तेत शिकत असून, सोलारीस क्लब येथे प्रशिक्षक विरेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तीचे या गटातील या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र मंडळ लॉन टेनिस अकादमीचे संचालक विक्रम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक धरणीधर मिश्रा व नितिन किर्तने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल –
8 वर्षाखालील मिश्र गट – उपांत्य फेरी
रित्सा कोंदकर(1) वि.वि देवराज मंदाडे 6-3
आर्यन किर्तने(2) वि.वि सुजय देशमुख(3)6-2
अंतिम फेरी- आर्यन किर्तने(2) वि.वि रित्सा कोंदकर(1) 7-1
10 वर्षाखालील मुले- उपांत्य फेरी
सक्षम भन्साळी(1) वि.वि अर्चित धुत(3) 6-2
शार्दुल खवले(5) वि.वि देवराज मंदाडे(8) 6-0
अंतिम फेरी- शार्दुल खवले(5) वि.वि सक्षम भन्साळी(1) 7-4
10 वर्षाखालील मुली – उपांत्य फेरी
प्रिशा शिंदे(1) वि.वि रित्सा कोंदकर 6-2
मृणाल शेळके(2) वि.वि काव्या देशमुख(3)6-3
अंतिम फेरी – प्रिशा शिंदे(1) वि.वि मृणाल शेळके(2)7-1