कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध आयपीएल 2023च्या 61व्या महत्त्वपूर्ण सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवला. तसेच, प्ले-ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. मात्र, या सामन्यानंतर केकेआर संघाचा भाग असलेला शार्दुल ठाकूर त्याचा जुना सहकारी दीपक चाहरसोबत जर्सीची अदलाबदली करताना दिसला. सीएसकेने हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) प्रथमच कोलकाता नाईट रायडर्सचा भाग बनला आहे. तसेच,चेन्नईविरुद्धच्या या सामन्यात शार्दुलने चेंडूसह महत्त्वपूर्ण योगदान दिले. संघाला गरज असताना निर्णायक वेळी डेवॉन कॉनवेची विकेट मिळवली. तसेच, कर्णधार नितीश राणा आणि रिंकू सिंग यांच्यातील 99 धावांच्या भागीदारीमुळे कोलकाता संघाने सामना आपल्या नावावर केला.
व्हिडिओ तुफान व्हायरल
केकेआरच्या विजयानंतर शार्दुल आणि दीपक जर्सीची देवाणघेवाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडू आधी हस्तांदोलन करत आहेत आणि नंतर जर्सीची देवाणघेवाण करतात. या वेळी शार्दुल म्हणतो की, “ही जर्सी घातल्यावर त्याला पुन्हा सीएसकेमध्ये आल्यासारखे वाटले.” जेव्हा शार्दुल ठाकूर चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता, त्यावेळी संघाने दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
Cherry x Dhool 🫂👕
Just like old times 💛#CSKvKKR #WhistlePodu #Yellove 🦁 @deepak_chahar9 @imShard pic.twitter.com/V6ukokt5LH— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 15, 2023
कोलकाता अजूनही प्ले-ऑफच्या शर्यतीत
चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्धच्या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Right) प्ले-ऑफच्या शर्यतीमध्ये स्वतःला कायम राखले आहे. मात्र, केकेआरचे आता 13 सामन्यांनंतर 12 गुण झाले असून संघ गुणतालिकेच्या सध्या 7व्या स्थानावर आहे. केकेआरला आता शेवटचा साखळी सामना जिंकण्याबरोबरच प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतर सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याला संघात न घेण्याचे दु:ख अजूनही…’, पराभवानंतर CSKच्या कोचची KKRच्या ‘या’ खेळाडूबद्दल प्रतिक्रिया
धोनीकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी गावसकरांनी भेदला सुरक्षा घेरा, पळत जाऊन मारली मिठी, पाहा संपूर्ण व्हिडिओ