बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ अपेक्षित सुरूवात करू शकला नाही. नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. पहिल्या डावात भारतासाठी केएल राहुल व्यतिरिक्त एकही फलंदाज अर्धशतकी योगदान देऊ शकला नाही. शार्दुल ठाकूर याने राहुलच्या साथीने महत्वपूर्ण धावा केल्या. पण याचदरम्यान अष्टपैलूला गंभीर दुखापत होता-होता राहिली.
भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात चहापाणापर्यंत 7 विकेट्सच्या नुकसानावर 176 धावा केल्या. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याच्या रुपात भारताने सातवी विकेट गमावली. शार्दुलने 33 चेंडूत 24 धावांचे योगदान दिल्यानंतर कागिसो रबाडा याच्या चेंडूवर डीन एल्गरच्या हातात झेल दिली. डावातील 44व्या षटकात मात्र शार्दुलसोबत एक अपघात झाला. गेराल्ड कोएत्झी याने षटकातील तिसरा शॉर्ट टाकला जो वेगात शार्दुलच्या हेलमेटवर लागला.
OMG that is so nasty, hope Thakur is ok ????????????#INDvsSA #SAvIND pic.twitter.com/Jsp4GuMmO1
— Hasnain Shah ???? (@shahhasnain77) December 26, 2023
चेंडू लागल्यानंतर शार्दुल काही क्षणांसाठी शार्दुल अस्वस्थ झाला होता. हा प्रकार घडताच भारतीय संघाचे फिजिओ तत्काळ मैदानात धावत आले आणि त्यांनी अष्टपैलूची पाहणी केली. यानंतर अंदाजे 10 मिनिटांसाठी खेळ थांबवला गेला. शार्दुलाने चेंडूचा जबरदस्त हादरा बसल्यानंतर खेळ पुठे सुरू ठेवताना दुसरे हेलमेट घातले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— akash singh (@akashsingh17654) December 26, 2023
दरम्यान, शार्दुलला या सामन्यात जखमी करणाऱ्या कोइट्जे इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयलीएल लिलावात मुंबई फ्रँचायझीने त्याला पाच कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. वनडे विश्वचषक 2023 मध्ये कोएत्झी याने 8 सामन्यांमधअये 20 विकेट्स नावावर केल्या होत्या. (Shardul Thakur could have been hurt on a dangerous bouncer ball, but escaped )
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानशी भिडण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममध्ये अश्विन-जडेजाची चर्चा, स्मिथसह फोटो व्हायरल
‘पोरा मला सगळीकडून ब्लॅाक केलंय’, शिखर धवन मुलाच्या वाढदिवशी भावुक






