---Advertisement---

लॉर्ड शार्दुलचा जलवा! गगनचुंबी षटकार मारण्याच्या बेतात असलेला आंद्रे रसेल मोक्याच्या क्षणी त्रिफळाचीत

On: रविवार, सप्टेंबर 26, 2021 9:18 PM
---Advertisement---

अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात शार्दुल ठाकूरने आपल्या गोलंदाजीने पुन्हा एकदा सर्वांना प्रभावित केले. उत्कृष्ट फॉर्ममध्ये गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने केकेआरचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलला आपल्या वेगाच्या जाळ्यात अडकवले.

लांब षटकार ठोकण्यासाठी ओळखला जाणारा आंद्रे रसेल अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर शार्दुल ठाकूरसमोर पूर्णपणे असहाय दिसला. त्याला शार्दुलने त्रिफळाचीत केले. शार्दुल चांगल्या लयीत गोलंदाजी करताना दिसत होता. १७ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आंद्रे रसेल शार्दुलच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. आंद्रे रसेलने १५ चेंडूत २० धावा केल्या होत्या. बाद झाल्यानंतर, रसेलच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती, तर मैदानावर असलेल्या स्क्रीनवर लॉर्ड शार्दुल लिहिलेले होते.

तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्स संघाने निर्धारित २० षटकात १७१ धावा केल्या आहेत. त्रिपाठी आणि नितीश राणा यांच्या खेळयांमुळे केकेआर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. त्रिपाठीने ४५ धावा आणि राणाने नाबाद ३७ धावा केल्या होत्या.

सीएसकेकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी धमाकेदार सलामी दिली. ऋतुराजने ४० धावा केल्या, तर प्लेसिसने ४३ धावा केल्या. मोईन अलीने ३२ धावा केल्या, तर रविंद्र जडेजाने उपयुक्त २२ धावांची खेळी केली. यामुळे चेन्नईचा विजयाचा मार्ग सुकर झाला. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना रंगला होता. केकेआरच्या सुनील नरेने सामन्यात मोठी रंगत आणली.

आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात केकेआरने चांगली कामगिरी केली नव्हती, त्यांनी ७ सामन्यांपैकी फक्त २ सामने जिंकले होते, पण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात आपले दोन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्याचवेळी, सीएसके संघ १० पैकी ८ सामने जिंकल्यानंतर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
-भावनेच्या भरात वाहून गेला व्यंकटेश अय्यर; आऊट झाल्यानंतरही लावली डीआरएसची वाट
-CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय
-शमीच्या तेज तर्रार चेंडूने अलगद उडवले केनचे स्टंप्स, व्हिडिओ बघून म्हणाल, नुसता धुरळा…!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---