भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना बुधवारी (7 जून) सुरू झाला. लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियान संघ भक्कम स्थितीमध्ये आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने 4 बाद 123 धावा केल्या असून, त्यांच्याकडे 296 धावांची आघाडी आहे. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मोठ्या धावांचा पाठलाग करावा लागू शकतो. मात्र, भारतीय संघाचा अष्टपैलू शार्दुल ठाकूर याने याबाबतीत मोठे वक्तव्य केले आहे.
भारतीय संघाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जबरदस्त पुनरागमन केले. अजिंक्य रहाणे व शार्दुल ठाकूर यांनी अर्धशतके झळकावल्याने भारतीय संघ सामन्यामध्ये राहिला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 173 धावांची आघाडी मिळाल्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखले. तिसरा दिवस संपल्यानंतर त्यांच्याकडे 296 धावांची मोठी आघाडी होती. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर शार्दुल ठाकूर हा पत्रकार परिषदेत आला. भारतीय संघ किती धावांचा पाठलाग करू शकतो असे विचारल्यानंतर तो म्हणाला,
“क्रिकेट हा एक मजेदार खेळ आहे, योग्य आव्हान काय आहे हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही. जो कोणी अंतिम फेरीत दडपण हाताळेल आणि एक चांगली भागीदारी असेल तर तुम्ही 450 किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग करू शकता, इंग्लंडने गेल्या वर्षी येथे चांगला पाठलाग केला होता त्यामुळे हे सकारात्मक चिन्ह आहे. कोणतीही भविष्यवाणी करणे खूप लवकर होईल.”
स्वतः शार्दुल ठाकूर याने या सामन्यात आपले विशेष योगदान दिले. फलंदाजीला आल्यावर त्याच्यावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आखूड टप्प्याच्या चेंडूने वार केले. मात्र, त्याने कमालीचे धैर्य दाखवत अर्धशतक पूर्ण करून भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले.
(Shardul Thakur Hoping India Chase 450 Runs In WTC Final)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स