भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने उत्तम गोलंदाजी केलेली आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने शार्दुलला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले होते व त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्याच षटकात डेव्हिड वॉर्नरला बाद करत मोहम्मद सिराजने मोठा धक्का दिला. यानंतर मार्कस हॅरिस व मार्नस लॅब्यूशेनमध्ये भागीदार होणार अशी चिन्हे दिसत असतानाच कर्णधार अजिंक्य रहाणेने शार्दुलला गोलंदाजीसाठी बोलावले. शार्दुलने देखील आपल्या पहिल्याच चेंडूवर हॅरिसला बाद करत अजिंक्यचा विश्वास सार्थ ठरवला.
आपल्या या कामगिरीत शार्दुलने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियात आपल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवणारा शार्दुल हा एकमेव भारतीय ठरला आहे. यापूर्वी कर्सन घावरी यांनी ऑस्ट्रेलियातील आपल्या दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली होती.
पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाच्या २७४ धावा –
ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाला मोहम्मद सिराज व शार्दुल ठाकूरने सुरुवातीचे झटके दिले. सिराजने वॉर्नरला तर शार्दुलने मार्कस हॅरिसला बाद केले. मात्र यानंतर स्मिथ व लॅब्यूशेनने उत्तम भागीदारी केली. स्मिथ बाद झाल्यानंतर भारतीय संघ सामन्यात जोरदार पुनरागमन करेल अशी शक्यता होती, मात्र लॅब्यूशेनचे 2 सोपे झेल सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला पुन्हा सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. या जीवदानाचा फायदा घेत त्याने शतकी खेळी केली. पण अखेर त्याला 108 धावांवर असताना टी नटराजनने बाद केले. तर मॅथ्यू वेडने 45 धावांची खेळी केली.
वेड आणि लॅब्यूशेन बाद झाल्यावर भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटले होते, पण कर्णधार टीम पेनने युवा कॅमेरॉन ग्रीनला साथीला घेत संघाचा डाव सांभाळला आणि पहिल्या दिवसाखेर आणखी विकेट जाऊ दिली नाही. दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 5 बाद 274 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितने घेतला स्मिथचा ‘सुंदर’ झेल आणि वॉशिंग्टनला मिळाली पहिली कसोटी विकेट, पाहा व्हिडिओ
…म्हणून ब्रिस्बेन कसोटीतून पदार्पण केलेल्या त्या भारतीय खेळाडूचे नाव आहे ‘वॉशिंग्टन’!
जबदस्त इच्छाशक्ती! एका कानाने ऐकू येत नसतानाही भारताकडून कसोटी खेळण्याचं स्वप्न केलंय पूर्ण