भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकत्याच पार पडलेल्या ब्रिस्बेन येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत बॉर्डर -गावसकर मालिका 2-1 ने जिंकली आहे. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात सर्वच खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः मालिकेतील शेवटच्या सामन्यात शार्दुल ठाकुरने आपल्या अष्टपैलू खेळाने भारताला सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. या कामगिरीबद्दल संपूर्ण क्रिकेट वर्तुळाकडून त्याचे कौतुक होत आहे.अशातच जेव्हा विजयी होऊन शार्दुल आपल्या घरी परतला, तेव्हा शेजारी तसेच गावकऱ्यांनी त्याचे जंगी स्वागत केले.
शार्दुल शुक्रवारी पालघर येथील आपल्या घरी पोहोचला. शार्दुल पोहोचल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याच्या नावाच्या घोषणा दिल्या. यानंतर सर्वांनी एकत्रपणे,” भारत माता की जय” असे असेही म्हटले. शार्दुलच्या आईने यावेळी त्याचे औक्षण केले. या सर्व प्रसंगाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
Welcome back @imShard #IndiavsAustralia pic.twitter.com/BXS8AZ8g3n
— RAMESH POWAR (@imrameshpowar) January 22, 2021
Welcome of Shardul Thakur at his home 💙🏘️🙌🏼
Palghar, Mumbai ✨ pic.twitter.com/ffgwleeePw— fcbsagarrrr• (@fcbsagar45) January 21, 2021
प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे शार्दुलला ब्रिस्बेन कसोटी सामन्यात अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. शार्दुलने या संधीचा पुरेपूर फायदा घेत अष्टपैलू कामगिरी केली. शार्दुलने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 3 प्रमुख फलंदाजांना बाद केले तसेच भारताच्या पहिल्या डावात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता.
शार्दुलने 115 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 67 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात देखील आपला शानदार फॉर्म कायम ठेवत शार्दुलने 4 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गारद केले. शार्दुलच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय संघाला आगामी काळात एक महत्त्वाचा खेळाडू मिळाला असल्याची चर्चा संपूर्ण क्रिकेट विश्वात रंगली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
RCB ने खरेदी केलेले DC चे ‘हे’ दोन धुरंदर यंदा संघाला जिंकून देऊ शकतात ट्रॉफी!
पासा पलट गया! एकवेळ शास्त्रींना ट्रोल करणारे चाहतेच मागतायत त्यांची क्षमा, जाणून घ्या कारण