भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक मालिका विजय मिळविला. या विजयानंतर भारतीय संघावर आता कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल याची प्रशंसा करत त्याच्याबाबत एक महत्वाचे विधान केले.
शशी थरूर यांनी यावेळी शुबमन गिल हा भारताचे विराट कोहलीनंतर नेतृत्व करेल, असे भाकीत वर्तविले आहे. ज्या पद्धतीची परिपक्वता शुबमनने दाखवली ते प्रशंसनीय आहे असे म्हणत थरूर यांनी शुबमनमध्ये कर्णधारपदाचेही गुण आहेत, असे म्हंटले आहे.
“गिल भविष्यातील कर्णधार”
एका संकेतस्थळाशी याबाबत बोलताना थरूर म्हणाले, “शुबमन अतिशय जबाबदारीने खेळत असल्याचे दिसून आले. तो जर पुढील काही वर्षे असाच खेळू शकला तर निश्चितच विराट कोहलीनंतर तोच भारताचा पुढचा कर्णधार असेल. मला त्याबाबत अजिबात शंका नाही. त्याच्याकडे पुरेपूर आत्मविश्वास आहे आणि माझ्या मते त्याच भविष्य अतिशय उज्ज्वल आहे.”
“सलामीला खेळवल्याने फायदा”
यावेळी थरूर यांनी शुबमनला सलामीला फलंदाजी करायला मिळाली, याबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “भारतीय संघाने शुबमनला सलामीला संधी झाल्याने मला अतिशय आनंद झाला. त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत उत्तम कामगिरी केली. माझ्या मते निवडकर्त्यांनाही त्याच्यासाठी सलामीची जागा योग्य आहे, असेच वाटले असेल. त्याला भविष्यातही याच जागी खेलाण्य्ची संधी मिळावी, अशो माझी इच्छा असेल.”
शुबमन गिलने याच दौऱ्यात भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र पदार्पणाच्या मालिकेतच त्याने तीन सामन्यात ५१.८० च्या जबरदस्त सरासरीने दोन अर्धशतकांसह २५९ धावा काढल्या. त्याच्या खेळाने प्रभावित झालेल्या अनेक दिग्गजांनी शुबमन भारताचा भविष्यातील स्टार आहे, असे भाकीतही वर्तवले आहे.
महत्वाच्या बातम्या:
वंदे मातरम! ब्रिस्बेन कसोटी विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या त्या फॅनचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
टीम इंडियाच्या विजयाने गुगल बाबाही खुश! ऑनलाईन फटाके फोडत क्रिकेटप्रेमींना मोठं सरप्राईज
म्हणून प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या डोळ्यात आले पाणी