---Advertisement---

“पुढचा धोनी कोण हे आधीच सांगितलं होतं..”, संजूच्या शतकानंतर शशी थरूर यांची 15 वर्ष जुनी पोस्ट व्हायरल

---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत संजू सॅमसननं चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं चौथ्या टी20 मध्ये 109 धावांची खेळी खेळली. या वर्षी संजूनं टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 3 शतकं झळकावली आहेत. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे.

संजूच्या या कामगिरीवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. शशी थरूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिलं की, “संजूबद्दल मी आधीच भाकीत केलं होतं की तो भारतीय क्रिकेटचा पुढचा धोनी आहे.” थरूर यांनी त्यांची 15 वर्ष जुनी पोस्ट टॅग करत लिहिलं, “15 वर्षांनंतर हे म्हणणं नेहमीच चांगलं असतं की, मी तुम्हाला हे सांगितलं होतं!”

शशी थरूर यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. शशी थरूर आणि संजू सॅमसन हे दोघेही केरळचे आहेत. थरूर यांना क्रिकेटची फार आवड असून ते सतत क्रिकेटबद्दल बोलत असतात. त्यांनी क्रिकेटबद्दल अनेक लेखही लिहिले आहेत.

 

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या नाबाद शतकांनंतर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या शानदार तीन विकेट्सच्या जोरावर भारतानं यजमान दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियानं चार सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली. यावर्षी खेळल्या गेलेल्या 26 टी-20 सामन्यांपैकी भारतानं 24 सामने जिंकले आहेत.

संजू सॅमसननं या सामन्यात 56 चेंडूत नाबाद 109 धावा केल्या. दुसऱ्या टोकावर तिलक वर्मानं अवघ्या 47 चेंडूत नाबाद 120 धावा ठोकल्या. या दोघांच्या शतकाच्या जोरावर भारतानं 20 षटकांत 283/1 धावांची मोठी मजल मारली. यासह सलग दोन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक ठोकणारा तिलक वर्मा केवळ दुसरा भारतीय ठरला आहे.

हेही वाचा – 

ऋतुराज गायकवाडनं भारतीय गोलंदाजांनाच धुतलं! पहिल्या कसोटीपूर्वी फलंदाजीनं खळबळ
याला म्हणतात ‘देशप्रेम’! सूर्यकुमार यादवनं असे काही केलं ज्याने सर्वांचे मन जिंकले, पाहा VIDEO
कर्णधार असावा तर असा! तिलक वर्मासाठी सूर्यानं केला मोठा त्याग, जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---