पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिसअजिंक्यपद टेनिस स्पर्धेत केपीआयटी, लॉ कॉलेज लायन्स, विनिंग एज, नवसह्याद्री डायनामाईट्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेटडिव्हिजन गटात किशोर पाटील, अम्ब्रिश सेठी, राजेश सिवस्कर, महेंद्र व्ही., निकांती रघु, नितीन बंटक्के, राजू कांगो यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर केपीआयटी संघाने पीवायसी फायटर्सचा 24-3 असा पराभव आगेकूच केली.
लॉ कॉलेज लायन्स संघाने विनिंग एज ब संघाचा 20-10असा सहज पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला. अन्य लढतीत विनिंग एज अ संघाने सोलारिस ब संघाचा 23-12 असा पराभव केला. विनिंग एज अ संघाकडून उद्य टेकाळे, निलेश नाफडे, अविनाश पवार, गंगा प्रसाद, मंदार कापशीकर, मुकेश देशपांडे यांनी सुरेख कामगिरी केली. नवसह्याद्री डायनामाईट्स संघाने फ्युचर प्रो संघावर 22-8 असा विजय मिळवला.
एफसीटीसी संघाने एमडब्लूटीए ब संघाचे आव्हान 22-18असे मोडीत काढले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: प्लेट डिव्हिजन:
केपीआयटी वि.वि.पीवायसी फायटर्स 24-3(100अधिक गट: किशोर पाटील/राजू कांगो वि.वि.चारू साठे/हरीश गलानी 6-0; खुला गट: अम्ब्रिश सेठी/राजेश सिवस्कर वि.वि.रवी रावळ/सुनीता रावळ 6-0; 90अधिक गट: महेंद्र व्ही./निकांती रघु वि.वि.गीता गोडबोले/अमित धोंगडे 6-2; खुला गट: नितीन बंटक्के/राजू कांगो वि.वि.विनायक भिडे/रवी रावळ 6-1);
एफसीटीसी वि.वि.एमडब्लूटीए ब 22-18(100अधिक गट:अर्जुन चितळे/जयंत चितळे वि.वि.प्रमोद पाटील/प्रमोद उमजरे 6-3;खुला गट: मनोज कुलकर्णी/सिद्देश परळकर पराभूत वि.स्वितल शहा/मंदार मेहेंदळे 5-6(1-7); 90अधिक गट: सुनील लोणकर/कपिल जोशी वि.वि.मिलिंद घैसास/आशिष राणा 6-3;खुला गट: अमित नूलकर/देवेंद्र बद्रे पराभूत वि.प्रफुल आशेर/रवी अज्जमपुडी 5-6(5-7));
लॉ कॉलेज लायन्स वि.वि.विनिंग एज ब 20-10(100अधिक गट: पानसे/सतीश ओरसे वि.वि.शशी कुलकर्णी/शैलेश मियोगी 6-2;खुला गट: सतीश ओरसे/प्रोफेसर जयभाई वि.वि.सुनील अहिरे/सचिन कुलकर्णी 6-1; 90अधिक गट: शिवाजी यादव/आदेश तेलंग वि.वि.अजय आपटे/सचिन फणसाळकर 6-1;खुला गट: तारक पारेख/अभिजित मराठे पराभूत वि.डॉ.पवार/विशाल गर्दे 2-6);
विनिंग एज अ वि.वि.सोलारिस ब 23-12(100अधिक गट: उद्य टेकाळे/निलेश नाफडे वि.वि.वसंत साठे/अनिल गायकवाड 6-5(7-2); खुला गट: अविनाश पवार/गंगा प्रसाद वि.वि.अमोल गायकवाड/आशिष कुबेर 6-1; 90अधिक गट: मंदार कापशीकर/मुकेश देशपांडे वि.वि.प्रसाद श्रीमनी/आशय गोव्हळे 6-0; खुला गट: आदित्य टेकळे/आशुतोष सोवनी पराभूत वि.अश्विन हळदणकर/शिव जावडेकर 5-6(4-7));
नवसह्याद्री डायनामाईट्स वि.वि.फ्युचर प्रो 22-8(100अधिक गट: गजानन कुलकर्णी/किशोर स्वामी वि.वि.बिंदू लोद्या/ब्रुनो रूबिनो 6-1; खुला गट: रोहन राजापूरकर/आदित्य जोशी पराभूत वि.शूभक्त बिस्वाल/मंदार ग्यान 4-6; 90अधिक गट: राजेश पातरकर/उमेश भिडे वि.वि.श्रीराम वैद्य/प्रकाश सूर्यवंशी 6-0; खुला गट: आशिष दिहे/गजानन कुलकर्णी वि.वि.ब्रुनो रूबिनो/पराग छेडा 6-1)