भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा लवकरच पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. चाहत्यांना तिच्या फटकेबाजीचा आनंद पुन्हा एकदा घेता येणार आहे. यासाठी निमित्त ठरणार आहे इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ ही स्पर्धा.
‘द हंड्रेड’ म्हणजे १०० चेंडूंचा एक डाव असलेले सामने यात खेळवले जातात. यावर्षी इंग्लंडमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. शेफालीला बर्मिंगहॅम फिनिक्स संघाने करारबद्ध करत आपल्या संघात स्थान दिले आहे.
दरम्यान, या स्पर्धेत खेळणारी शेफाली पाचवी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ती शर्मा या चार खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेण्याचे निश्चित केले होते. बीसीसीआयने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले होते. शेफालीला देखील हे प्रमाणपत्र आता बीसीसीआयने दिले आहे.
या अनुभवाचा फायदा शेफालीलाच नव्हे तर भारतीय महिला क्रिकेट संघाला देखील होईल. शेफाली या स्पर्धेत बिग बॅश लीग मधील तिचे सिडनी सिक्सर्स संघाचे प्रशिक्षक बेन सॉयर यांच्याशी पुन्हा जोडली जाईल. याचा उपयोग तिला आपला खेळ सुधारण्यासाठी नक्कीच होईल.
शेफाली वर्माने यावर्षी भारताच्या दौर्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. तिने तीन टी२० सामन्यात अनुक्रमे ६०, ४७ आणि २३ धावांच्या खेळी केल्या होत्या. शेफालीने या मालिकेत केलेल्या चांगल्या कामगिरी मागील मेहनतीचा उलगडा करतांना हरयाणाच्या पुरुष क्रिकेट संघासह सराव केल्याचा खुलासा केला होता.
शेफालीच्या फिटनेसमध्ये सुधारणा
शेफालीने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेतील चांगल्या कामगिरीचा खुलासा करतांना तिने घेतलेल्या मेहनतीचा उल्लेख केला होता. हरयाणाच्या पुरुष क्रिकेट संघाविरुद्ध तिने फलंदाजीचा सराव केला होता. १४० किमी प्रति तासापेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करणार्या गोलंदाजांसमोर सराव केल्याने तिला वेगाची सवय झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरूद्ध फटके खेळतांना अधिक वेळ मिळाला, असा खुलासा शेफालीने केला. याशिवाय तिने आपल्या फिटनेसवर देखील कठोर मेहनत घेतली होती. परिणामी फिटनेस मध्ये सुधारणा झाल्याने तिचा खेळ देखील उंचावला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आनंदाची बातमी! केकेआरचे कोरोना पॉझिटिव्ह असलेले हे दोन खेळाडू परतले घरी
आयपीएल स्थगित होणे या संघांना ठरणार फायदेशीर? ४ दिग्गज दुखापतीतून सावरुन करु शकतात पुनरागमन