---Advertisement---

खराब खेळपट्टीमुळे हा सामना करावा लागला रद्द; खेळाडू झाले जखमी

On: रविवार, डिसेंबर 8, 2019 4:38 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन देशांतर्गत स्पर्धा शेफील्ड शिल्ड दरम्यान खराब खेळपट्टीमुळे खेळाडूंना दुखापत झाली. व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी)  होत असलेला सामना खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला.

या  बाबतीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी सांगितले की, ‘या मैदानावर 26 ते 30 डिसेंबरदरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात एमसीजी स्टेडियमवर होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी एमसीजीचे कर्मचारी प्रयत्नशील असतील.’

व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान खराब खेळपट्टीमुळे अनेक फलंदाजांना फलंदाजी करताना चेंडू लागले, त्यानंतर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

 

व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या शेफील्ड शील्ड सामन्यात अचानक उसळी घेणाऱ्या चेंडूमुळे बरेच फलंदाज जखमी झाले. शाॅन मार्शला वेगवान उसळी घेणाऱ्या चेंडू लागला तर मार्कस स्टॉयनिसला असाच एक चेंडू बरगडीमध्ये लागला. हे पाहता पंचांनी कर्णधारांशी बोलल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

26 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात एमसीजीवर होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वीचा हा शेवटचा सामना होता.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे संचालन प्रमुख पीटर रोच म्हणाले की, सामना रद्द झाल्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत. एमसीजी मैदानातील कर्मचाऱ्यांना दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी आहे आणि कसोटीसाठी एक उत्कृष्ट खेळपट्टी तयार केली जाईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---