---Advertisement---

सौराष्ट्राला रणजी ट्रॉफी मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केलेला ‘हा’ खेळाडू आता खेळणार ‘या’ संघाकडून

---Advertisement---

मुंबई । मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवीची नुकतेच पुडुचेरी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांनतर आता मागील वर्षी सौराष्ट्राला पहिल्यांदा रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा स्टार फलंदाज शेल्डन जॅक्सन हा यंदाच्या वर्षात पुडुचेरी संघाकडून क्रिकेट खेळणार आहे. 

उजव्या हाताने फलंदाजी करणारा जॅक्सनने 2019-20 या सत्रात 10 सामन्यांतील 18 डावांत 50.56 च्या सरासरीने 808 धावा केल्या आहेत. पुडुचेरी संघाकडून क्रिकेट खेळण्याच्या निर्णयावर जॅक्सन म्हणाला की,”पुडुचेरी संघाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेणे हा माझ्यासाठी सर्वात अवघड होता. मला वाटते की, पुढे जाण्यासाठी आणि कोणत्या संघासाठी अथवा राज्यासाठी व्यावसायिक स्वरूपात क्रिकेट खेळण्याची हीच वेळ आहे.”

पुडूचेरी क्रिकेट संघाचे सचिव वि.चंद्रन पीटीआयशी बोलताना म्हणाले की,  “मागील मोसमात दुखापतीमुळे बाहेर राहिलेला वेगवान गोलंदाज पंकज सिंग पुन्हा एकदा पुडुचेरी संघाकडून खेळण्यास तयार आहे. आणखी स्टार फलंदाज पारस डोगरा हा संघाकडून खेळणारा तिसरा पाहुणा खेळाडू आहे.”

सौराष्ट्र संघाकडून 2011 साली पदार्पण करणाऱ्या जॅक्सन याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 49.42 च्या सरासरीने 5634 धावा केल्या आहेत.  यात 19 शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. जॅक्सनला दुसर्‍या रणजी संघाकडून क्रिकेट खेळण्यासाठी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून(एससीए) ‘एनओसी’ (ना हरकत प्रमाणपत्र) मिळाले आहे.

33 वर्षीय जॅक्सन म्हणाला की, “आतापर्यंतचा प्रवास खूप दमदार राहिला आहे. माझ्या चांगल्या आणि वाईट वेळेस सौराष्ट्र संघ पाठीशी होता. त्याबद्दल मी सौराष्ट्र क्रिकेट संघाचे आभार मानतो.” एससीएचे अध्यक्ष जयदेव शहाने जॅक्सनचे कौतुक करत त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सीएपीचे सचिव जॅक्सनचे स्वागत करताना म्हणाले की, “2020-21 या सत्रात शेल्डन जॅक्सन, पारस डोग्रा आणि पंकज सिंग हे तीन खेळाडू पुडुचेरी संघाकडून क्रिकेट खेळणार आहेत. या तीन खेळाडूंनी रणजी क्रिकेटमध्ये बरीच वर्ष दमदार कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले आहे.”

ट्रेंडिंग घडामोडी – 

ब्रॉडला संघात संधी न मिळण्याबद्दल अँडरसन म्हणाला, इंग्लंडसाठी चांगली गोष्ट झाली की…

पुतण्या, काका, मावसभाऊ, मेहुणा; पहा कसे आहेत क्रिकेटपटू एकमेकांचे नातेवाईक

वनडेमध्ये चौथ्या क्रमांक आपल्या धुवांदार फलंदाजीने गाजवणारे ३ भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---