पुणे। ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-ग्रँड स्लॅम टेनिस अकादमी चॅम्पियनशीप सिरीज राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात रित्सा कोंडकर, शिबानी गुप्ते यांनी तर, मुलांच्या गटात स्मित उंद्रे, नमिश हूड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
नटराज टेनिस कोर्ट, कर्वेनगर या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलींच्या गटात पाचव्या मानांकित रित्सा कोंडकरने सहाव्या मानांकित सृष्टी सूर्यवंशीचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-1 असा पराभव केला. बिगरमानांकीत शिबानी गुप्तेने दुसऱ्या मानांकित जान्हवी चौगुलेचा 6-0, 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालासह अंतिम फेरीत धडक मारली.
मुलांच्या गटात अव्वल मानांकित स्मित उंद्रेने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसऱ्या मानांकित आरव पटेलचा 6-0, 6-0 असा पराभव केला. नमिश हूड याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या अझलन शेखचा 6-0, 6-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्य फेरी):
मुले:
स्मित उंद्रे[1]वि.वि.आरव पटेल[3] 6-0, 6-0;
नमिश हूड वि.वि.अझलन शेख 6-0, 6-1;
मुली:
रित्सा कोंडकर[5]वि.वि.सृष्टी सूर्यवंशी[6] 7-6(4), 6-1;
शिबानी गुप्ते वि.वि.जान्हवी चौगुले[2]6-0, 6-2;
दुहेरी: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
शौर्य गदाडे/हर्ष परिहार[4]वि.वि.अवधूत निलाखे/अर्णव पांडे 6-2, 6-0;
वेदांत गायकवाड/अथर्व डाकरे वि.वि.पार्थ दाभीकर/रौनक हरियानी 6-1, 7-5;
आर्यन कीर्तने/आरव पटेल[1]वि.वि.सुजय देशमुख/नमिश हूड 7-6(9-7), 6-3;
कबीर गुंडेचा/वीर चतुर[3]वि.वि.अझलन शेख/तनिश पाटील 1-6, 6-0, 10-1;
महत्त्वाच्या बातम्या –
राम स्पोर्टिंगवरील विजयाने घोरपडी तमिळ युनायटेड सी गटात अव्वल
मुंबई इंडियन्सचा ‘धोनीसेने’विरुद्ध २० वा विजय! पाहा सीएसकेला सर्वाधिकवेळा कोणी केलय पराभूत
‘पुढच्या हंगामात सर्व ठीक होईल, चढ-उतार येत असतात’, मुंबई इंडियन्सच्या सलामीवीराचा विश्वास