मुंबई। आयपीएल प्ले-आॅफला आजपासुन सुरवात होत आहे. प्ले-आॅफमधील क्वालिफायर 1 चा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात आज मुंबईमधील शेषराव वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्यात हैद्राबादचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनला आयपीएलच्या इतिहासात मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
सध्या धवन चांगल्या फॉर्ममध्ये खेळत असून त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 140 सामन्यात 33.59 च्या सरासरीने 3998 धावा केल्या आहेत.
त्यामुळे त्याला आता 4000 आयपीएल धावांचा टप्पा पार करण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. आयपीएलमध्ये हा टप्पा फक्त 6 भारतीय तर एकूण 7 खेळाडूंनी पार केला आहे.
दोन दिवसापूर्वीच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने हा टप्पा पार केला आहे.
तसेच याआधी आयपीएलमध्ये 4000 धावा विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, गौतम गंभीर, राॅबीन उथप्पा, एमएस धोनी आणि डेविड वार्नर या खेळाडूंनी केला आहे. यामध्ये वार्नर एकमेव परदेशी खेळाडू आहे.
धवनने या आयपीएल मोसमात 13 सामन्यात 4 अर्धशतकांसह 437 धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
4948 धावा (सामने- 163): विराट कोहली
4931 धावा (सामने- 174): सुरेश रैना
4493 धावा (सामने- 173): रोहित शर्मा
4217 धावा (सामने- 154): गौतम गंभीर
4081 धावा (सामने- 163): राॅबीन उथप्पा
4014 धावा (सामने- 114): डेविड वार्नर
4007 धावा (सामने- 173): एमएस धोनी
3998 धावा (सामने- 140): शिखर धवन