कपिल देव, एमएस धोनी, विराट कोहली यांना न जमलेला पराक्रम कर्णधार शिखर धवनने करून दाखवला आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजला ३९ वर्षानंतर पहिल्यांदाच वनडे मालिकेत क्लीन स्वीप केले आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला गेला. या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईसच्या नियामानुसार ११९ धावांनी विजय मिळवला आहे. या मालिकेत भारताने ३-० असा विजय मिळवल्याने त्यांचा ड्रेसिंग रूममधील जल्लोष आणि धवनच्या त्या कमेंटचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
सामना जिंकल्यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांनी संघाचे कौतुक केले आहे. धवन म्हणाला, या मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजी उत्तम झाली आहे. सांघिक कामगिरी पाहून आनंद झाला आहे. तसेच क्रिकेटच्या मैदानात असो वा ड्रेसिंग रुममध्ये
बीसीसीआयने सोशल मीडियावर शेयर केलेल्या व्हिडिओमध्ये धवन बोलताना दिसत आहे. ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना उभे राहा म्हणताना तो त्यांना उद्देशून म्हणतो, ‘जेव्हा मी विचारेल की आपण कोण आहोत? तेव्हा चॅम्पियन असे म्हणायचे’, असे त्याने ठरवले. संघानेही कर्णदाराचे मानून तशी क्रिया केली आहे.
या व्हिडिओमध्ये धवन मोठ्याने विचारतो, ‘की आपण कोण आहोत,’ तेव्हा सगळे एकासुरात म्हणतात, ‘वी आर चॅम्पियन’.
From The #TeamIndia Dressing Room!
Head Coach Rahul Dravid & Captain @SDhawan25 applaud 👏 👏 the team post the 3-0 win in the #WIvIND ODI series. 🗣 🗣
Here's a Dressing Room POV 📽 – By @28anand
P.S. Watch out for the end – expect something fun when Shikhar D is around 😉😁 pic.twitter.com/x2j2Qm4XxZ
— BCCI (@BCCI) July 28, 2022
धवनने या मालिकेत धडाकेबाज फलंदाजी करत संघाचे नेतृत्वही चांगले केले आहे. त्याने ३ सामन्यात ५६च्या सरासरीने १६८ धावा केल्या आहेत. या मालिकेत भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे खेळू नाही शकला. यामुळे संघाच्या अडचणी वाढतील अशा शंका येत होत्या. मात्र फिरकीपटू अक्षर पटेल याने ती जबाबदारी योग्यतेने पार पाडली आहे. त्याने दुसऱ्या वनडेत नाबाद ६४ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
शेवटच्या सामन्यात सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याने झंझावाती नाबाद ९८ धावांची खेळी केली आहे. याच सामन्यात फिरकीपटू युझवेंद्र चहल याने ४ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाची भुमिका पार पाडली आहे. विशेष म्हणजे भारत विराट, रोहित शर्मा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत ही वनडे मालिका खेळला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॉमनवेल्थ गेम्स: ‘आम्ही येथे फक्त गोल्ड जिंकायला आलो आहोत’, यष्टीरक्षक-फलंदाजाने केला दावा
शुभमनचं शतक हुकलं! पण पठ्ठ्यानं थेटं केली सचिन अन् सेहवागची बरोबरी, पाहा काय आहे विक्रम