भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष सध्या भारताच्या येत्या श्रीलंका दौऱ्यावर लागले आहे. १३ जुलैपासून या दौऱ्याचा शुभारंभ होणार असून उभय संघात ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी काही दिवसांपुर्वीच भारतीय संघ श्रीलंकेला रवाना झाला आहे. अशात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची सलामी जोडी, पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांचा एक मजेशीर व्हिडिओ चाहत्यांच्या भेटीला आणला आहे.
या व्हिडिओत कर्णधार धवन आणि युवा फलंदाज पृथ्वी आमने सामने आहेत. त्यांच्यात एक गमीतीशीर खेळ रंगला आहे. तो खेळ म्हणजे, ‘म्यूझिक ऍँड माइम’. या खेळामध्ये एकटा आपल्या कानाला हेडफोन लावतो आणि दुसरा चिठ्ठीमध्ये दिलेली वस्तू आवाज न काढता इशाऱ्याने किंवा तोंडाच्या हालचालीने सांगतो. यावरुन पहिल्या व्यक्तीला त्या वस्तूचे नाव ओळखायचे असते.
या रोमांचक खेळात धवन आणि पृथ्वी आपापल्या अंदाजात प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहेत. धवनने श्रीलंका दौऱ्यावरील आपल्या संघ सहकाऱ्यांची नावे सांगितली आहेत. तर पृथ्वी खाण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांची नावे पटापट ओळखतो आहे. यावरुन या विस्फोटक सलामी जोडीमध्ये खूप चांगले बाँडिंग असल्याचे स्पष्ट होते.
Loud music blaring in your ears 🎶
Your teammate miming & mouthing words 🗣️
This guessing game takes a hilarious turn very soon 😄 #TeamIndia #SLvIND
Presenting Music & Mime ft. @SDhawan25 & @PrithviShaw 😎 – by @ameyatilak
Full video 🎥 👇 https://t.co/nzOZEZjeC3 pic.twitter.com/ZxfxDGj1Ok
— BCCI (@BCCI) July 1, 2021
श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिका दोन्हीही संघांसाठी महत्त्वपुर्ण असणार आहेत. या मालिकेद्वारे क्रिकेटपटू आगामी टी२० विश्वचषकाची तयारी करणार आहेत. विशेष बाब अशी की, धवन श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पहिल्यांदाच संघनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली युवा खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ मैदान गाजवताना दिसेल. देवदत्त पडीक्कल, चेतन सकारिया, ऋतुराज गायकवाड अशा बरेचसे नवखे शिलेदारही श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
काय सांगता? केवळ १० चेंडूत संपला होता ‘तो’ कसोटी सामना, कारण होते विचित्रच
“युनिस खानने माझ्या गळ्यावर चाकू ठेवला होता”, माजी पाकिस्तानी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
“भारताविरुद्ध कसोटी मालिकेत आम्ही सर्वात मजबूत संघ मैदानात उतरवू”, इंग्लिश कर्णधाराने फुंकले रणशिंग