---Advertisement---

शिखर धवनने हा विक्रम करत धोनीला टाकले मागे

On: शुक्रवार, मे 25, 2018 7:57 PM
---Advertisement---

कोलकता। आयपीएल 2018 च्या प्ले-आॅफमधील क्वालिफायर 2 चा सामना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात आज कोलकताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात हैद्राबादचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनने आयपीएलच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.

त्याने आज आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये हा टप्पा पार करणारा तो केवळ सातवा भारतीय आणि एकूण आठवा खेळाडू ठरला आहे.

या सामन्याआधी त्याला आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 2 धावांची गरज होती. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या क्वालिफायर1 च्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला त्यामुळे त्याचा हा विक्रम लांबला.

याआधी आयपीएलमध्ये 4000 धावा विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, गौतम गंभीर, राॅबीन उथप्पा, एमएस धोनी आणि डेविड वार्नर या खेळाडूंनी केला आहे. यामध्ये वार्नर एकमेव परदेशी खेळाडू आहे.

काही दिवसापूर्वीच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीनेही आयपीएलमध्ये 4000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे. पण आज शिखरने 24 चेंडूत 34 धावा करत त्याला  आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मागे टाकले.

त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 141 सामन्यात 33.32 च्या सरासरीने 4032 धावा केल्या आहेत.

धवन या आयपीएल मोसमात चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने या मोसमात 4 अर्धशतकांसह 15 सामन्यात 39.25 च्या सरासरीने 471 धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:

4953  धावा (सामने- 175): सुरेश रैना

4948 धावा (सामने- 163): विराट कोहली

4493  धावा (सामने- 173): रोहित शर्मा

4217  धावा (सामने- 154): गौतम गंभीर

4084  धावा (सामने- 164): राॅबीन उथप्पा

4032* धावा (सामने- 141): शिखर धवन

4016  धावा (सामने- 174): एमएस धोनी

4014  धावा (सामने- 114): डेविड वार्नर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment