इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 10 संघांपैकी काही संघ खूपच निराशाजनक कामगिरी करताना दिसत आहेत. मात्र, या संघांचे कर्णधार भलतेच फॉर्ममध्ये आहेत. या कर्णधारांमध्ये पंजाब किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन याचाही समावेश आहे. सोमवारी (दि. 8 मे) ईडन गार्डन्समध्ये आयपीएल 2023च्या 53व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स वि. पंजाब किंग्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात कर्णधार शिखर धवन याने अर्धशतक झळकावत विक्रमांचे मनोरे रचले.
शिखर धवनचा विक्रम
कोलकाता विरुद्ध पंजाब संघातील या सामन्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्याने संघाकडून डावाची सुरुवात केली. त्याने यावेळी सलामीला फलंदाजी करताना 47 चेंडूत 57 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 9 चौकारांचाही पाऊस पाडला. हे धवनचे हंगामातील तिसरे अर्धशतक होते. यासह त्याने दोन विक्रम नावावर केले.
शिखर धवनने आधी टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 1000 धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर त्याने या अर्धशतका झळकावताच धवनच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला. धवनने आयपीएल कारकीर्दीतील 50वे अर्धशतक पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला.
Dhawan keeps scaling new Shikhars! 📈
Sadda skipper becomes only the 3rd player with 50 fifties in the #TATAIPL! 🤩#KKRvPBKS #JazbaHaiPunjabi #SaddaPunjab #TATAIPL @SDhawan25 pic.twitter.com/9cvSGJCXct
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 8, 2023
डेविड वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक अर्धशतके
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्याचा विक्रम डेविड वॉर्नर (David Warner) याच्या नावावर आहे. वॉर्नरने आतापर्यंत 58 अर्धशतके केली आहेत. तसेच, त्याने आयपीएल कारकीर्दीत 6211 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावांचा बाबतीत तो तिसऱ्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त सर्वाधिक अर्धशतके करणारा आणखी एक फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराट आणि धवनचे सारखेच म्हणजेच प्रत्येकी 50 अर्धशतके आहेत. मात्र, विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये 7043 धावा केल्या आहेत. तसेच, शिखर धवन याबाबतीत दुसऱ्या स्थानी असून त्याच्या आयपीएलमध्ये 6593 धावा आहेत. (shikhar dhawan completed his 50th half century in ipl )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वयाच्या 37व्या वर्षी गब्बरचा नादच खुळा! कर्णधार म्हणून टी20 क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास विक्रम
जलवा है हमारा यहां! वानखेडेतील विराटचा ‘तो’ व्हिडिओ तुफान व्हायरल; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘विषये का’