न्यूझीलंडच्या दौऱ्यातील पहिल्या वनडेमध्ये छोटी पण उत्तम खेळी करणारा भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन दुसऱ्या सामन्यात बाकावर बसवला गेला आणि भारताचा कर्णधार शिखर धवन याच्या या आश्चर्यकारक निर्णयावर चाहत्यांनी टीकांचा भडीमार केला. मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावरही चाहत्यांनी राग व्यक्त केला. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला तेव्हा भारताचा 12.5 षटकांचा खेळ झाला होता. या सामन्यानंतर धवनने सॅमसनला संघात का नाही घेतले याचे कारण सांगितले आहे.
संजू सॅमसन (Sanju Samson) याच दौऱ्यात झालेल्या टी20 मालिकेच्या एकाही सामन्यात खेळला नाही. तेव्हाचा भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यानेही कारण सांगितले होते. त्याने म्हटले की त्याला संधी न मिळणे हे खरच निराशाजनक आहे. जर मालिका तीन पेक्षा अधिक सामन्यांची खेळली गेली असती तर नक्कीच त्याला संघात घेतले असते. नंतर त्याला ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात अंतिम अकरामध्ये जागा मिळाली. त्या सामन्यात त्याने 38 चेंडूत 36 धावा केल्या, त्याचबरोबर श्रेयस अय्यर याच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 77 चेंडूत 94 धावांची भागीदारी केली.
सॅमसनला संघात का घेतले नाही, याचा खुलासा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याने केला आहे. त्याने म्हटले, “आम्हाला सहाव्या गोलंदाजाची आवश्यकता होता, त्यामुळे सॅमसनला बाहेर केले गेले आणि हुडाला घेतले. चाहर चेंडू चांगला स्विंग करतो यामुळे त्याला घेतले गेले. काही जणांना विश्रांती दिली असली तरीही सध्याचा संघ मजबूत आहे.” समजा, जर भारतीय संघाचा तिसऱ्या वनडे सामन्यासाठीही असाच विचार डोक्यात राहिला तर त्याही सामन्यात सॅमसनला जागा मिळणार नाही.
“सामना रद्द झाला हे आमच्या हातात नव्हते. आम्ही सर्वजण सामना कधी सुरू होतो याची वाट पाहत होतो. खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती आणि गिल ज्याप्रकारे कामगिरी करत आहे, ते अद्भुत आहे,” असेही धवनने पुढे म्हटले.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि मालिका निर्णायक सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) क्रिस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. Shikhar Dhawan Explain Why Sanju Samson was not in Playing eleven for second ODI vs New Zealand
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय रे जिंदगी! 18 सेकंद धावले 11 खेळाडू, पण एका फलंदाजाला करू शकले नाहीत बाद; पाहा व्हिडिओ
धोनी आणि पंड्याचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल, काला चष्मा गाण्यावर थिरकले पाय