भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन हा सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. आता आगामी काळात तो आयपीएलच्या सोळाव्या हंगामात खेळताना दिसेल. यावेळी त्याला पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. आयपीएलच्या या हंगामा आधी त्याने नुकतीच एका बड्या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्याने आपल्या खाजगी आयुष्यावर देखील प्रतिक्रिया दिली.
शिखर धवनने मागील वर्षी आपली पत्नी आयेशा मुखर्जीं हिच्यापासून फारकत घेतली होती. सध्या त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावर लवकरच निकाल येऊ शकतो. याच मुद्द्यावर त्याला या मुलाखतीत प्रश्न विचारला असता तो म्हणाला,
“आमचे लग्न यशस्वी झाले नाही हे खरे आहे. मात्र याबाबत मी कोणालाही दोषी धरू इच्छित नाही. कोणते नाते कसे चालेल याचा मला अनुभव नव्हता. मी 26-27 वयापर्यंत एकटा होतो. त्यानंतर या सर्व गोष्टी घडल्या.”
दुसऱ्यांदा लग्न करण्याबाबत विचारले असता तो म्हणाला,
“सध्या याबाबत तसा काही विचार झालेला नाही. मात्र, एक निश्चित आहे की पुन्हा लग्नाचा निर्णय घेतल्यास आधी सारखी चूक होणार नाही. व्यक्ती पूर्णता समजून घेतल्यानंतरच लग्न करेल.”
शिखर धवन याने 2012 मध्ये आयेशा मुखर्जीं हिच्याशी लग्न केले होते. आयेशा त्यावेळी घटस्फोटीत होती. अशा परिस्थितीत शिखरने तिच्या दोन्ही मुलींना आपले नाव दिले. त्यानंतर या दोघांना जोरावर नावाचा मुलगा झाला. शिखर व आयेश वेगळे झाल्यानंतर जोरावर आयेशासोबत असतो. शिखर आपल्या मुलाला भेटल्यानंतर त्याच्यासोबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतो.
(Shikhar Dhawan First Time Speaks On His Divorce With Ayesha Mukherjee)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WPL फायनलमध्ये रंगणार कर्णधारांचे युद्ध! हरमन बदला घेणार की लॅनिंग हॅट्रिक साधणार?
नंबर वन यारी! रिषभला भेटण्यासाठी पोहोचले भारतीय दिग्गज, म्हणाले, ‘फिनिक्स पक्षासारखी भरारी घे’