भारत आणि न्यूझीलंड संघात तिसरा एकदिवसीय सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळला गेला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. त्याचबरोबर भारतीय संघाला या मालिकेत 1-0च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाला या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्याने कर्णधार शिखर धवन याने नाराजी व्यक्त केली. या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या 6 सामन्यांपैकी 3 सामने पावसामुळे रद्द झाले तर एका सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार देण्यात आला. यावर शिखर धवन याने प्रतिक्रिया दिली.
शिखर धवन (Shikhar Dhawan) याने म्हटले आहे की, “आता आमचा पुढचा दौरा बांगलादेश विरुद्ध आहे. मी अशी अपेेक्षा करतो की तिकडे हवामान स्वच्छ असेल. आमचा संघ युवा संघ आहे. गोलंदाजांनी गुडलेंथवर कशी गोलंदाजी करावी हे शिकलेच असेल, त्यांना ही गोष्ट सातत्याने गोलंदाजी करुन अनुभवातून शिकावी लागेल.”
भारतीय कर्णधाराने म्हटलय की, “खेळपट्टी सुरुवातीला गोलंदाजांनी मदत करत होती, जे की न्यूझीलंडमध्ये सामान्य आहेे आणि आम्ही भागीदारी करु शकत होतो. बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाच्या वरीष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होईल आणि तिथून आम्ही विश्वचषकाची तयारी सुरु करणार आहोत. तो म्हणाला की मी युवा खेळाडूंना बारकाव्यांवर लक्ष देण्याचा सल्ला देतो. अशा सरळ गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आम्ही नशीबवान आहोत की आमचे चाहते आम्हाला प्रोत्साहन देत असतात आणि आम्ही त्यांना नेहमी खुश करत राहू अशी अपेक्षा आहे.”
त्यातच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याने म्हटलय की, “जेव्हाही आम्ही खेळतो, आमचा संघ चांगले प्रदर्शन करतो. पावसामुळे रद्द झालेल्या दोन्ही सामन्यातही आम्ही चांगले प्रदर्शन केले होते. पाऊसामुळे आमचा अपेक्षाभंग झाला. आम्हाला माहिती होते की 20 षटकांनंतर सामन्याचा निकाल लागू शकतो. आमच्या गोलंदाजांनe खेळपट्टीकडून मदत मिळत होती. डॅरील मिचेल (Daryl Mitchell) आणि ऍडम मिल्ने (Adam Milne) यांना मदत मिळत असल्याने आम्ही त्यांचा जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला. आता आमचे लक्ष कसोटी सामन्यांवर असणार आहे. आधी खेळाडूंना आराम दिला जाईल, त्यानंतर कसोटी संघात नवे चेहरे बघायला मिळतील.”
न्यूझीलंड दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पहिल्या सामन्यात 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. 300पेक्षा अधिक धावा करुनही भारतीय संघ आव्हानाचा बचाव करण्यात असमर्थ राहिला. टॉम लॅथम (Tom Latham) आणि केन विलियम्सन यांनी भारतीय गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. दुसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला आणि फक्त 12.5 षटकांचा खेळ होऊ शकला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली आणि संघ फक्त 219 धावा करु शकला. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 18 षटकात 1 गडी गमावत 104 धावा केलेल्या. तेवढ्या पाऊस आला आणि सामना रद्द करण्यात आला.(Shikhar Dhawan has said that we lacked in something)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पाच नामांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का
रिषभ पंतला का दिली जात आहे जास्त संधी? वीवीएस लक्ष्मणने केला खुलासा