भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज शिखर धवन मागच्या मोठ्या काळापासून आपल्या कौटुंबीक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. डिसेंबर 2023 मध्ये धवनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त एक भावूक पोस्ट शेअर केली. आता पुन्हा एकदा धवनने मुलाला भेटण्यासाठी होत असलेल्या वेदना सर्वांसमोर मांडल्या आहेत. आयशा मुखर्जीसोबत घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्या मुलाचा संभाळ आई करत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिखर धवन (Shikhar Dhawan) आपल्या मुलाविषयी बोलला. धवन म्हणाला, “मला माझ्या मुलाची गळाभेट घ्यायची आहे. मी रोज त्याला संदेश पाठवत असतो. मला माहीत नाही की, तो संदेश त्याच्यापर्यंत जातो की नाही. पण मी एक वडील आहे आणि माझे कर्तव्य पार पाडत आहे. मला त्याची आठवण येते आणि वाईट वाटते. पण मी आता असं जगायला शिकलो आहे. मागच्या पाच-सहा महिन्यांपासून मी त्याच्याशी बोललो नाहीये.”
शिखर धवन याने 2012 मध्ये आयशा मुखर्जीसोबत लग्न केले होते. धवनसोबत लग्न करण्याआदी आयशाला पहिल्या लग्नानंतर झालेल्या दोन मुली देखील होत्या. तिने 2021 मध्ये सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून धवनसोबत घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले होते. घटस्फोटावेळी धवनकडून मानसिक त्रास दिल्याचे आरोप आयशावर केले गेले होते. त्याचसोबत कोट्यावधी रुपयांची पसवनूक केली असेही आरोप धवनकडून आयशावर केले गेले.
न्यायालयात धवन आणि आयशाचा घटस्फोट मंजूर केला गेला. पण मुलाचा सांभाळ धवन केरल, असा निर्णय भारतातील कोणतेच न्यायालय करू शकले नाही. कारण आयशा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. अशात धवनचा मुलागा झोरावर देखील आईसोबत ऑस्ट्रेलियामध्येच राहतो.
दरम्यान, शिखर धवनचे कौटुंबीक आयुष्या मागच्या काही वर्षात अनपेक्षित पद्धतीने बदलताना दिसल आहेच. पण त्याची क्रिकेट कारकीर्द देखील मागच्या काही वर्षात अपेक्षित मार्गाने चालली नाहीये. धवनने आपला सेवटचा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. आगामी आयपीएल हंगामात त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्ज विजेतेपदसाठी खेळेल. (Shikhar Dhawan is emotional again for his son zoravar)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! जय शहा ACC अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, डोक्यात आहे मोठा प्लॅन
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा । स्पर्धेच्या अकराव्या दिवशी महाराष्ट्राला १ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके