---Advertisement---

‘पोरा मला सगळीकडून ब्लॅाक केलंय’, शिखर धवन मुलाच्या वाढदिवशी भावुक

On: मंगळवार, डिसेंबर 26, 2023 6:43 PM
Shikhar-Dhavan
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन सध्या संघाबाहेर आहे. तो क्रिकेटपासून दूर असला तरी धवनचे आयुष्य अडचणींनी भरलेले दिसते. मात्र, आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार असून पुढील हंगामात तो खेळताना दिसणार आहे. अलीकडच्या काळात धवनला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) हीच्यापासून विभक्त झाल्यानंतर, शिखर धवन (Shikhar Dhavan) एका वर्षाहून अधिक काळ त्याचा मुलगा जोरावरला प्रत्यक्ष भेटू शकला नाही. इन्स्टाग्रामवर एका भावनिक सोशल मीडिया पोस्टमध्ये धवनने असाही दावा केला की, त्याला सर्व व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक केले गेले आहे ज्याद्वारे तो त्याच्या मुलाशी कनेक्ट होऊ शकतो.

या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्ली न्यायालयाने शिखर धवनला त्याची पत्नी आयशा धवनने केलेल्या छळाच्या कारणास्तव घटस्फोट मंजूर केला होता. न्यायालयाने धवनला त्याच्या मुलाला भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये भेटण्याचे अधिकार दिले आहेत. कोर्टाने आयशाला मुलगा जोरावरला भारतात आणण्याचे आदेश दिले होते. यात जोरावरला धवन आणि त्याच्या कुटुंबासोबत रात्रभर राहू देणे आणि शाळेच्या सुट्ट्यांमध्ये धवन आणि त्याच्या कुटुंबासोबत खेळू देणे देखील समाविष्ट आहे. परंतू सध्या असे दिसते की, धवन त्याच्या मुलाशी अक्षरशः संपर्कही साधू शकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) 

धवनने इंस्टाग्रामवर एका भावनिक पोस्टमध्ये लिहिली तो म्हणाला, “मी तुला प्रत्यक्ष भेटून एक वर्ष झाले आहे आणि आता जवळजवळ तीन महिन्यांपासून मला सर्वत्र ब्लॉक केले आहे. माझ्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी तेच चित्र पोस्ट करत आहे. जरी मी तुझ्याशी थेट संपर्क साधू शकत नसलो तरी मी तुझ्याशी टेलिपॅथीद्वारे कनेक्ट होतो. मला तुझा खूप अभिमान आहे आणि मला माहित आहे की, तू चांगले काम करत आहेस आणि चांगले वाढत आहे. पप्पा नेहमी तुझी आठवण काढतात आणि तुझ्यावर प्रेम करतात. तो नेहमी सकारात्मक राहतो आणि हसत हसत आपण पुन्हा कधी भेटू याची वाट पाहतो. खोडकर हो, पण विध्वंसक होऊ नको. नम्र, दयाळू, धैर्यवान आणि बलवान हो.”

धवनने पुढे लिहिले की, “तुला न पाहिल्यावरही मी जवळपास रोजच तुला मेसेज लिहितो. तुझे कल्याण आणि दैनंदिन जीवनाबद्दल विचार करत असतो. मी काय करत आहे आणि माझ्या आयुष्यात नवीन काय आहे ते मला तुमच्यासोबत शेअर करू द्या. लव्ह यू माझ्या झोरा.” (Shikhar Dhawan is emotional on his son’s birthday My son has blacked me from everywhere)

हेही वाचा

Boxing Day Test । रोहितवर विराट पडला भारी! ‘या’ बाबतीत ठरला सर्वात उजवा
IND vs SA: मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका कसोटीत न खेळण्याने दिग्गज क्रिकेटपटू नाराज; म्हणाला, ‘ही अत्यंत लाजिरवाणी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---